लैंगिक जीवन : पार्टनर जवळ येत नाही? हे तर कारण नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 03:21 PM2019-02-15T15:21:05+5:302019-02-15T15:21:24+5:30

जग इतकं पुढे गेलं असून आजही कपल्स शारीरिक संबंधासारख्या महत्त्वाच्या विषयावर मोकळेपणाने बोलत नाहीत.

Reason behind why your partner is not showing interest in sex | लैंगिक जीवन : पार्टनर जवळ येत नाही? हे तर कारण नाही ना?

लैंगिक जीवन : पार्टनर जवळ येत नाही? हे तर कारण नाही ना?

googlenewsNext

जग इतकं पुढे गेलं असून आजही कपल्स शारीरिक संबंधासारख्या महत्त्वाच्या विषयावर मोकळेपणाने बोलत नाहीत. पुरूषांना त्यांच्या लैंगिक समस्येबाबत बोलायला अडचण येते, तर महिला लैंगिक समस्येची स्वत:च्या शारीरिक आकर्षणाशी तुलना करतात. त्यांना वाटत असतं की, त्यांचं शरीर आकर्षक नसल्याने त्यांचा पार्टनर त्यांच्याजवळ येत नाही. पण तुमचा जोडीदाराची लैंगिक इच्छा का कमी झाली हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण यामागे काही मोठं कारण असू शकतं. 

टेस्टोस्टेरॉनची कमतरता

टेस्टोस्टोरॉन हार्मोन्स पुरुषांच्या लैंगिक इच्छे मागचं एक मोठं कारण आहे. हे हार्मोन्स कमी झाल्याने व्यक्तीतील कामेच्छा आणि शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. पण तुमचा पार्टनर जवळ येत नाही, याचं खरं कारण जाणून घेण्यासाठी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 

डिप्रेशनचे शिकार

तुम्हाला कदाचित जाणवलं नसेल पण तुमचा पार्टनर डिप्रेशनने ग्रस्त असू शकतो. डिप्रेशनमुळेही त्याची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी झाली असावी. जर त्यासाठी त्यांच्यावर जोर टाकला तर त्यांची चिडचिड वाढू शकते. याने तुमचं नातं आणखी अडचणीत येऊ शकतं. कारण असं केलं तर तुमचा पार्टनर तुमच्यापासून आणखी दूर जाऊ शकतो. 

दारू, सिगारेटची सवय

दारू किंवा सिगारेटची सवयीचाही नात्यांवर खोलवर वाइट प्रभाव पडतो. या सवयी फार काळ शरीरावर वाईट प्रभाव करतात. त्यामुळे हार्मोन्सही प्रभावित होतात. त्यामुळेही कामेच्छा कमी होते. 

न्यूनगंड

शारीरिक संबंधादरम्यान पुरूष त्यांच्या महिला पार्टनरला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. जर त्यांच्या लक्षात आलं की, असं होत नाहीये, तर त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यात अडचण येते. नंतर त्यांच्या मनात एक भिती बसते. पार्टनरला खूश करू शकत नसल्याचा न्यूनगंड त्यांच्या मनात तयार होतो. 

भावनिक जवळीकता कमी

तुमचा पुरूष पार्टनर आणि तुमच्यात जर भावनिक जवळीकता नसेल तर तो तुमच्या जवळ येणार नाही. कोणत्याही नात्यासाठी भावनिक जवळीकता गरजेची असते. ती नसेल तर पार्टनर दूर जाण्याला काहीतरी कारण असतं. 

लैंगिक क्रियेचा कंटाळा

शारीरिक संबंधाबाबत तुमच्या पार्टनरची आणि तुमची गरज वेगवेगळी असू शकते. अनेकदा पुरूषांना लैंगिक जीवनात वेगवेगळ्या गोष्टी किंवा नव्या पद्धती ट्राय करायच्या असतात. पण महिला यासाठी कधी कधी तयार होत नसतात. नात्यातही वेळोवेळी काही नवीन होत नसेल तर पार्टनरचं आकर्षणही कमी होत असतं. यानेच लैंगिक क्रियेतीलही रस कमी होतो. 
 

Web Title: Reason behind why your partner is not showing interest in sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.