शारीरिक संबंधासाठी दुपारची कोणती वेळ योग्य, एक्सपर्ट काय सांगतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:30 PM2019-03-23T15:30:24+5:302019-03-23T15:31:59+5:30

शारीरिक संबंधासाठी पहाटेची वेळ सर्वात चांगली मानली जाते. तज्ज्ञही या वेळी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देतात.

Know from the expert which time of the day is best to get intimate or have sex | शारीरिक संबंधासाठी दुपारची कोणती वेळ योग्य, एक्सपर्ट काय सांगतात?

शारीरिक संबंधासाठी दुपारची कोणती वेळ योग्य, एक्सपर्ट काय सांगतात?

googlenewsNext

शारीरिक संबंधासाठी पहाटेची वेळ सर्वात चांगली मानली जाते. तज्ज्ञही या वेळी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देतात. अनेक कपल्सही त्यांच्या अनुभवातून असंच मानतात. मात्र हॉर्मोन एक्सपर्ट अलीसा विट्टी यांना असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या मते शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ पहाटे नाही तर दुसरीच आहे. 

हार्मोन्स एक्सपर्ट अलीसा यांनी डेली मेलला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि त्यातून संतुष्टी मिळवण्यासाठी सर्वात चांगली वेळ ही दुपारी ३ वाजताची असते. म्हणजे दुपारी ३ वाजता शारीरिक संबंध ठेवल्याने अधिक फायदा होतो. अलीसा यांच्यानुसार, यावेळी महिलांमध्ये कॉर्टिसोल हार्मोन्सचा स्तर सर्वात जास्त वाढलेला असतो. 

कॉर्टिसोल हार्मोन स्ट्रेस कमी करून महिलांना अलर्ट ठेवण्यासाठी मदत करतो. दिवसा ३ वाजता या हार्मोनचा स्तर सर्वात जास्त असतो. त्यामुळे यादरम्यान महिला सर्वात जास्त एनर्जेटिक असतात.  

अलीसा यांच्यानुसार, दिवसाच्या या वेळी महिला आणि पुरूष दोघांच्या कामुक भावना एकसारख्या असतात. आणि त्यामुळेच अशावेळी शारीरिक संबंध ठेवले तर परमोच्च आनंद मिळण्याची शक्यता जास्त असते. 

मात्र, दुपारी ३ वाजता पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर कमी होतो. पण सेक्शुअल रिलेशनवेळी ते पार्टनरला भावनिक आधार देतात आणि गरजा पूर्णा करण्यास मदत करतात. 

Web Title: Know from the expert which time of the day is best to get intimate or have sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.