तुम तो ठहरे परदेसी... ...सातारा कितना बदनाम करोगे?

By सचिन जवळकोटे | Published: December 24, 2017 11:41 PM2017-12-24T23:41:49+5:302017-12-25T02:33:00+5:30

विदर्भातल्या व-हाडी मंडळींनी ठाकरे फॅमिलीची झोपमोड केली म्हणून थेट महाबळेश्वरमधल्या हॉटेललाच सील ठोकणारे कदमांचे रामदास मुंबईचे.

 You are the so-called Pardesi ... ... so defame Satara? | तुम तो ठहरे परदेसी... ...सातारा कितना बदनाम करोगे?

तुम तो ठहरे परदेसी... ...सातारा कितना बदनाम करोगे?

Next

सातारनामा

विदर्भातल्या व-हाडी मंडळींनी ठाकरे फॅमिलीची झोपमोड केली म्हणून थेट महाबळेश्वरमधल्या हॉटेललाच सील ठोकणारे कदमांचे रामदास मुंबईचे. दिवाळीचा जुना ‘हिशोब’ चुकता झाला नाही म्हणून सातारी अधिका-याच्या पिस्तुलाचा भलामोठ्ठा बागुलबुवा करणारे सदाभाऊ वाळव्याचे. औद्योगिक विकास खुंटल्यानं नाईलाजानं कास पठारावर पोटपाण्याचा पर्यटन उद्योग करू पाहणाºया सातारकरांची बांधकामं उद्ध्वस्त करायला निघालेले विजयबापू पुरंदरचे. ही सारी मंडळी कधीतरी साताºयात ‘वन डे ट्रीप’ करून पुन्हा आपापल्या गावी जाणारी. या नेत्यांचा कुठला तरी वैयक्तिक हेतू साध्य करण्याच्या नादात ऐतिहासिक जिल्ह्याची बदनामी व्हायला नको, हीच तमाम सातारकरांची तळमळीची इच्छा. कुणीतरी या विषयाला तोंड फोडायला हवं होतं, ते आम्ही ‘सातारनामा’मधून करतोय... एवढंच. कारण इतरवेळी जिल्ह्याचा नको तेवढा कैवार घेऊन रस्त्यावर उतरण्याचं नाटक करणारी काही स्थानिक लोकप्रतिनिधी मंडळी सत्ताधाºयांच्या अचाट भूमिकेविरोधात बोलण्याचं धाडस कधी करणार? हा प्रश्न गुलदस्त्यातच.
साताºयात प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्यालय आहे, हे आम्हा पामरांना आजच समजलं. महाबळेश्वरच्या ‘कीज’ हॉटेलला सील ठोकण्याची कारवाई करणाºया अधिका-यांच्या हाताला लकवा मारलेला नाही, हेही कळून चुकलं. नेत्याच्या कानाला त्रास झाला तरच अधिकाºयांचे हात सळसळतात, हेही प्रथमच पटलं.
जिल्ह्याच्या नदी-नाल्यांमध्ये कैक कारखान्यांचं विषारी केमिकल राजरोसपणे मिसळलं जात असताना पांढºया पाकिटाला चटावलेली ‘प्रदूषण’वाली मंडळी वºहाडींचा राग काढायला मात्र एका हॉटेलवर तुटून पडली. हाच नियम लावायचा असेल तर जिल्ह्यातील सर्वच मंगल कार्यालयांना टाळं ठोकायला हवं. मात्र, केवळ पडत्या फळाची आज्ञा पाळणाºया या ‘सांगकाम्या’वाल्यांंचा कारभार अजबच.
महाबळेश्वरच्या संपूर्ण घटनेचा सारांश एकच. केवळ ठाकरे फॅमिलीला त्रास झाला म्हणून सेनेच्या मंत्र्याला प्रदूषण नियंत्रण कायद्याची आठवण झाली. विधानसभेच्या अधिवेशनात परब नामक आमदारानं विषय मांडताच कदमांनी हॉटेलवर कारवाईची घोषणा केली.
खरंतर, ध्वनी प्रदूषणाचा नियम मोडला गेला असेल तर कारवाई संबंधित वरातीवर व्हायला हवी; परंतु सत्ताधारी भाजपा आमदाराच्या वºहाडींना हात लावण्याची धमक नाही म्हणून महाबळेश्वरचं चालतं-बोलतं हॉटेलच बंद करताय? तुमच्या हतबलतेचा राग साताºयातल्या उद्योग धंद्यांवर काढताय? तुम्ही मारे मुंबईत बसून आदेश देताय... पण इथं साताºयाची पर्यटनस्थळं विनाकारण बदनाम होताहेत, त्याचं काय?

साता-याची इमेज
‘बिहारी’ बनवू नका..
सातारा जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या अंत्यसंस्काराकडं पाठ फिरविणारे भाऊ बाकीच्या गोष्टीत मात्र नको तेवढा इंटरेस्ट घेतात म्हणे. खरंतर, या भाऊंचंही बरोबरच. पुरंदरच्या बंगल्याचे उंबरठे झिजविणारे सातारी अधिकारी वाळव्याच्या छोट्याशा घराला दूरूनच नमस्कार का ठोकतात, याचा शोध केवळ पवारांच्या अनिलना लागला म्हणून त्यांनी सदाभाऊंना रामराम ठोकून पुन्हा शेट्टींचा हात धरला.
असो, लोकसभेला माण-खटावच्या शिवारात बांधावर भाजी-भाकर खाऊन शड्डू ठोकणाºया सदाभाऊंची अलीकडं ‘भूक’ वाढलीय, हे मात्र एकशे एक टक्के. म्हणूनच ‘दिवाळी गिफ्ट’ घेऊन आपल्या गावी न येणाºया अधिकाºयांना ‘टारगेट’ करण्याचा धडाका सुरू झालाय. शेती खात्यातले शिंदे खूप प्रामाणिक आहेत, असं कुणीही म्हणणार नाही; परंतु केवळ ‘आकडा’ पूर्ण केला नाही म्हणून त्यांच्या पिस्तुलाचा बागुलबुवा करणाºया सदाभाऊंची भूमिका कधीच न पटणारी. एका साध्या अधिकाºयासाठी लाल दिव्याच्या गाडीत बसून सदाभाऊ अधिवेशनातली प्रश्नोत्तरंही मॅनेज करतात, तेव्हा वाटतं की आपल्या जिल्ह्यात दुसरा कोणता मोठा प्रश्न शिल्लक राहिलाच नाही की काय? एक अधिकारी कमरेला पिस्तूल लावून पायावर पाय टाकून मोठ्या ऐटीत बसलाय अन् त्याला घाबरून एक पालकमंत्री कोपºयात लपलाय, अशी ‘बिहारी इमेज’ साताºयाची झाल्याचा भास होऊ लागतो. मग, बाहेरचा अधिकारी आपल्या जिल्ह्याकडं उगाचंच संशयानं पाहू लागतो.. कारण आपापले ‘हिशोब’ चुकविण्याच्या नादात साताºयाची बदनामी होऊ लागलीय, त्याचं काय?
सातारकरांना जगू द्या,
पोटावर पाय नको..
पुरंदरहून साताºयाचा कारभार हाकू पाहणाºया विजयबापूंना आजपर्यंत जिल्ह्याचे प्रश्न किती समजले, हा संशोधनाचाच विषय. डीपीडीसीच्या सभेत दोन-चार अधिकाºयांना झापाझापी केली, म्हणजे सारेच प्रश्न सुटत नसतात. असो, मधल्या काळात कुणीतरी टिनपाट कार्यकर्त्यानं तक्रार केली म्हणून बापू कास पठारावर गेले. स्थानिकांनी स्वत:च्या जागेत बांधलेली बांधकामं म्हणजे सरकारी जागेवरच अतिक्रमण झाल्याच्या अविर्भावात बापूंनी ही बांधकामं बुलडोझरनं उद्ध्वस्त करण्याचे आदेशही दिले. असो, पालकमंत्री हा जिल्ह्याला विकासाशी जोडणारा असतो की तोडफोडीची भाषा करणारा असतो, याचं उत्तर काही तेव्हापासून सर्वसामान्य सातारकरांना उमगलंच नाही. एकतर साताºयात औद्योगिक विकास नाही. नोकºयांअभावी इथली तरणी-ताठी पोरं पुण्या-मुंबईत स्थलांतरित होताहेत, अशावेळी पर्यटन हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून कास पठारावर पोट भरायला गेलेल्या सातारकरांची स्वप्नं पायदळी तुडविताय? बांधकामं नियमात बसत नसतील तर बसवून द्या. गेल्या साठ-सत्तर वर्षांत राज्यातल्या हजारो बकाल झोपडपट्ट्या अधिकृत करण्यात प्रत्येक सरकारनं धन्यता मानली. मग साताºयाच्याच बाबतीत एवढी कठोर भूमिका का? चुकीच्या पद्धतीची बांधकामं झालेल्यांवर कारवाई व्हायलाच हवी; मात्र कुठल्यातरी छाडमाड कार्यकर्त्याच्या आसुरी आनंदापोटी अख्खं कासं पठार वेठीस धरण्याचं पाप पुन्हा होऊ नये, हीच प्रत्येक सातारकरांची इच्छा... कारण, ‘टारगेट’ पूर्ण करण्याच्या नादात कास पठार परिसर बदनाम होऊ लागलाय, त्याचं काय?

Web Title:  You are the so-called Pardesi ... ... so defame Satara?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.