दुचाकी नाल्यात पडून महिला जखमी, आॅफिसला जाताना सातारा माचीपेठेत झाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:24 IST2017-12-14T19:22:44+5:302017-12-14T19:24:32+5:30
घरातून आॅफिसला जात असताना सातारा येथील माची पेठेत एका वळणावर अंदाज न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महिला नाल्यात पडून जखमी झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता झाला.

दुचाकी नाल्यात पडून महिला जखमी, आॅफिसला जाताना सातारा माचीपेठेत झाला अपघात
सातारा : घरातून आॅफिसला जात असताना येथील माची पेठेत एका वळणावर अंदाज न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महिला नाल्यात पडून जखमी झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता झाला.
संबंधित महिला आॅफिसला निघाली होती. माची पेठेत आल्यानंतर जीवन ज्योत हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळण घेत असताना संबंधित महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. यामध्ये संबंधित महिला जखमी झाली. त्या जखमी महिलेला काही नागरिकांनी जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, समर्थ मंदिर ते पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळच्या सुमारास नेहमी वर्दळ असते. याचवेही हा अपघात झाला. त्यामुळे बराचेवळ वाहतुकीची कोंडीही झाली होती. रस्ता अरूंद असल्यामुळे सर्व वाहने जागच्या जागीच उभी होती. काही वेळानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.