पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:48 PM2017-12-11T14:48:37+5:302017-12-11T14:52:19+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.​​​​​​​ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाले. अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहे.

Dhangarwadian accident on Pune-Bangalore National highway, two wheelers killed on the spot | पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार

Next
ठळक मुद्देदुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघातअधिक तपास शिरवळ पोलिसाकडे

शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

बाळासाहेब नामदेव पवार (वय ४२) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एका खासगी कंपनीत कामगार असलेल्या बाळासाहेब पवार (रा. बावडा, ता. खंडाळा) हे बावडा येथे दुचाकीवरून (एमएच ११ एएस ४०४७) घरी निघाले होते.

यावेळी धनगरवाडी गावच्या हद्दीत दुचाकी आले असता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाले. अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहे.
 

Web Title: Dhangarwadian accident on Pune-Bangalore National highway, two wheelers killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.