हेरिटेज वास्तू किलबिलाटांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:09 PM2018-11-29T23:09:40+5:302018-11-29T23:09:44+5:30

सातारा : भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया ज्या शाळेत मजबूत केला, त्या शाळेला पुन्हा ...

Waiting for heritage architectural twitter | हेरिटेज वास्तू किलबिलाटांच्या प्रतीक्षेत

हेरिटेज वास्तू किलबिलाटांच्या प्रतीक्षेत

Next

सातारा : भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया ज्या शाळेत मजबूत केला, त्या शाळेला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. राजवाड्यावरील पूर्वी वसतिगृहासाठी वापरण्यात येणारी दगडी भिंतीची हेरिटेज वास्तू डागडुजी करून ज्ञानदानाच्या कार्यासाठी सज्ज केली जाणार आहे. लवकरच या इमारतीत मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मालकीचे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव हायस्कूल असणाऱ्या प्रतापसिंह हायस्कूलचा विद्यार्थी पट दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरातील इतर खासगी शाळांच्या स्पर्धेत ही शाळा टिकलेली नाही. ती टिकावी आणि पुन्हा तिला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी धोरणात्मक कार्यक्रम आखणे जरुरीचे आहे. या शाळेला पूर्णवेळ मुख्याध्यापक पदही नाही. जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी असणाºया मुजावर यांच्याकडे हे अतिरिक्त पद आहे. शाळेची गुणवत्ता वाढवायची झाल्यास गुणवंत व तळमळीने काम करणाºया गुरुजनांची गरज आहे.
सध्या ही शाळा ज्या इमारतीत भरते, ती ऐतिहासिक राजवाड्याची इमारत मोडकळीला आली आहे. मागील वर्षी शाळा प्रवेश दिनाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीपराव कांबळे उपस्थित होते. या दोघांनीही या शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार पूर्वी ज्या ठिकाणी वसतिगृह होते, त्याच इमारतीची डागडुजी करून ती पुन्हा वापरात आणण्यात येऊ शकते, असा विचार पुढे आला. त्यानुसार जिल्हा परिषदेने या इमारतीच्या डागडुजीसाठी ७ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. ही इमारत हेरिटेज वास्तू आहे. मात्र, पूर्णपणे दगडांमध्ये बांधलेल्या इमारतींचे चिरे भक्कम आहेत. या इमारतीचा वरचा मजला व छताची दुरुस्ती करावी लागणार आहे. यावर्षीच्या शाळा प्रवेश दिनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने मंत्रालयात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे व शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर उपस्थित होते. तेव्हा स्वत: मंत्री बडोले यांनी प्लॅन, इंस्टिमेंटसह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच मुलांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.
प्रस्ताव सादरीकरणाबाबत बडोलेंच्या सूचना
गतवर्षीपासून साताºयासह राज्यात ७ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिन साजरा केला जातो. या दिनाच्या तयारीसाठी मुंबईत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला साताºयातून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश क्षीरसागर हे दोघे गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले, त्या शाळेच्या नूतनीकरणासाठी निधी दिला जाणार आहे, याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना बडोले यांनी दिल्या आहेत.

Web Title: Waiting for heritage architectural twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.