उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:35 PM2019-03-27T17:35:06+5:302019-03-27T17:37:28+5:30

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जावळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात सभापीठावर दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणाभाका घेतल्या.

 Udayanaraje- Shivendra Sinhaganja Ghatbhate: Celebration of Manoililana again in Satara district | उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्व

उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्व

googlenewsNext
ठळक मुद्दे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्वखोटारड्या अन् जुमलेखोरांना वेळीच हद्दपार करण्याचे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आवाहन

सातारा : देशातील जनता फसवणुकीला कंटाळली आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांची लबाडी मतदारांनी अनुभवली. अशा खोटारड्या आणि जुमलेखोरांना कायमस्वरूपी हद्दपार करा. सातारकर कायम राजघराण्याच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत यावेळीही हेच होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जावळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते. सभापीठावर या मेळाव्यात दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणाभाका घेतल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष माधवी कदम, सभापती मिलिंद कदम, वनिता गोरे, उपसभापती जितेंद्र सावंत, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, ऋषिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, साताऱ्यात दोन्ही राजेंच्या मनोमिलनमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. हे चैतन्य कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याची जबाबदारी दोन्ही राजेंची आहे. कार्यकर्त्यांनी मनापासून परस्परांचे काम करून पुढे जावे.ह्ण
खासदार उदयनराजे म्हणाले, ह्यसाताऱ्याच्या विकासाठी आम्ही कटिबद्ध आहे. आमच्या विरोधकांनी आमच्यावर दहशत करत असल्याचा आक्षेप घेतला आहे, माझी दहशत प्रेमाची आणि आदराची आहे, हे त्यांच्यासारख्यांना समजणार नाही.

उदयनराजे आणि मी निवडणुकीमुळे एकत्र आलेलो नाही, ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या भल्यासाठी एकत्र आलो आहे. आपापसातील संघर्ष आम्ही नक्की सोडवू, कानाला लागून गैरसमज पसर्वणाऱ्यांचा आम्ही दोघेही बंदोबस्त करु, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विधानसभा मतदार संघात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

ते म्हणाले की, भूतकाळात अनेक कटू प्रसंग घडून गेले आहेत. ते प्रसंग उगाळीत न बसता आता सर्वांनी वाटचाल करायला हवी. संघर्ष टाळण्यासाठी साताऱ्याच्या भल्यासाठी एकत्र होणे गरजेचे होते. आमच्याकडून कुठलाही दगाफटका होणार नाही, याचा विश्वास बाळगा. माझे सख्खे मामा दादाराजे खर्डेकर लोकसभेला उभे असताना दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी पक्षनिष्ठेसाठी माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे काम केले होते. मला पक्षनिष्ठा महत्वाची आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'केवळ साता?्याच्या विकासाच्या मुद्द्यावर हे मनोमिलन झाले आहे. यात कोणताही गोपनीय हेतू नाही. कार्यकर्त्यांनी एकदिलाने लोकसभेसाठी खासदार उदयनराजे यांचे काम करावे.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांनीही कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. प्रारंभी सातारा जावलीच्या पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आघाडी धर्म पाळणे आणि मनोमिलन अबाधित राहण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी वसंतराव मानकुमरे, चंद्रकांत जाधव, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title:  Udayanaraje- Shivendra Sinhaganja Ghatbhate: Celebration of Manoililana again in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.