साताऱ्यातील मंगळवार तळ्यात एकाने मारली उडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 06:21 PM2017-10-14T18:21:01+5:302017-10-14T18:30:34+5:30

सातारा येथील मंगळवार तळ्यात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीने उडी मारली. हा प्रकार तळ्याशेजारी असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले.

On Tuesday in the Saturn pond, one looted in the pool! | साताऱ्यातील मंगळवार तळ्यात एकाने मारली उडी!

सातारा येथील मंगळवार तळ्यात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीने उडी मारली

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलविलेयुवकांनी आरडाओरड केली, आवाजाने लोक आले धावततळ्यात त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे दुपारपर्यंत सुरू

सातारा, दि. १४ : येथील मंगळवार तळ्यात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीने उडी मारली. हा प्रकार तळ्याशेजारी असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले.


मंगळवार तळ्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. शनिवारीही दुपारीही नागरिक आपपल्या कामामध्ये व्यस्त असताना अचानक एका व्यक्तीने मंगळवार तळ्यात उडी मारली.

हा प्रकार घडला त्यावेळी तळ्याशेजारी काहीजण गप्पा मारत उभे होते. त्यांना त्या व्यक्तीने तळ्यात उडी घेतल्याचे दिसले. त्यानंतर त्या युवकांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत आले.

मात्र, तोपर्यंत संबंधित व्यक्ती तळ्यात बुडाली होती. शाहूपुरी पोलिसांनाही याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्ती कोण होती, त्यांचे नाव काय? हे अद्याप पोलिसांनाही समजले नाही. तळ्यात त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे दुपारपर्यंत सुरू होते.
 

Web Title: On Tuesday in the Saturn pond, one looted in the pool!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.