भादे परिसरात तीन बिबट्यांचा वावर

By admin | Published: July 21, 2016 11:27 PM2016-07-21T23:27:09+5:302016-07-21T23:29:42+5:30

खंडाळा तालुका हादरला : पकडण्यासाठी अधिकारी तळ ठोकून

Three leopards in the Bharde area | भादे परिसरात तीन बिबट्यांचा वावर

भादे परिसरात तीन बिबट्यांचा वावर

Next

खंडाळा : अंदोरीत चार दिवसांपूर्वी आढळलेल्या एका बिबट्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नसतानाच गुरुवारी सायंकाळी आणखी दोन बिबट्यांचे दर्शन भादे परिसरात झाल्यामुळे संपूर्ण खंडाळा तालुका भेदरून गेला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन कर्मचारी याच परिसरात ठाण मांडून आहेत. अंदोरी येथील रुई शिवारात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन भटक्या कुत्र्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडली. तर त्याच रात्री एका दुचाकीस्वारावरही बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाचे एक पथक चार दिवसांपासून या परिसरात तळ ठोकून आहे. बिबट्याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी आढळलेले ठसे सोडल्यास हाती काहीच लागले नाही. खंडाळ्याचे वनक्षेत्रपाल ए. व्ही. शिंदे यांनी या घटनेचा अहवाल सातारा वनविभागाकडे पाठविला आहे. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी नागपूर येथील वन्यजीव संरक्षक विभागाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गतिमान हालचालीची गरज आहे. वरिष्ठ पातळीवरून विशेष मदत न मिळाल्याने हातावर हात ठेवून बसण्याची वेळ स्थानिक अधिकाऱ्यांवर आली आहे. दरम्यान, ‘त्या’ बिबट्याला पकडण्यासाठी नागपूरहून परवानगी घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) पिंजरा लावण्याची मागणी खंडाळा तालुक्यात तब्बल तीन बिबट्यांचे दर्शन झाल्यामुळे सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरा मागविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Three leopards in the Bharde area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.