पोलिसांवर हात उचलणाºयांची कºहाड बाजारपेठेतून धिंड! बघ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 09:19 PM2017-12-04T21:19:45+5:302017-12-04T21:23:25+5:30

कºहाड (जि. सातारा) : भरचौकात दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी कºहाड शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघांचीही सोमवारी न्यायालयापर्यंत चालत धिंड काढली.

Threats from the big market of police raising arms! The crowd watching | पोलिसांवर हात उचलणाºयांची कºहाड बाजारपेठेतून धिंड! बघ्यांची गर्दी

पोलिसांवर हात उचलणाºयांची कºहाड बाजारपेठेतून धिंड! बघ्यांची गर्दी

Next
ठळक मुद्देन्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली‘खाकी’वर हात उचलणाºया त्या दोघांची धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली

कºहाड (जि. सातारा) : भरचौकात दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी कºहाड शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघांचीही सोमवारी न्यायालयापर्यंत चालत धिंड काढली. पोलिस जीप ऐनवेळी नादुरुस्त झाल्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयापर्यंत व तेथून पोलिस ठाण्यापर्यंत चालवत नेले.
कºहाड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील सहायक फौजदार बळवंत चव्हाण व हवालदार उमेश माने हे रविवारी दुपारी दत्त चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी दुचाकीवरून निघालेल्या तीन युवकांना माने यांनी अडवले. दुचाकी चालविणाºया युवकाकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली. मात्र, संबंधित युवकाने अरेरावी करीत माने यांना धमकावले. सहायक फौजदार चव्हाण तेथे आले असता त्या युवकाने चव्हाण यांनाही दमदाटी करीत दोघांना लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या अन्य साथीदारानेही पोलिसांना बेदम मारले.

त्याही परिस्थितीत हवालदार माने व सहायक फौजदार चव्हाण यांनी एका युवकाला पकडून पोलिस ठाण्यात आणले. तर त्याचा साथीदार तेथून पसार झाला.याप्रकरणी माजी नगराध्यक्षांचा मुलगा सईद अल्ताफ शिकलगार (वय १८, रा. कºहाड) याला पोलिसांनी रविवारी दुपारीच अटक केली. तर पळून गेलेला त्याचा साथीदार इंद्रजित भिंताडे (वय २५, रा. कºहाड) याला रात्री उशिरा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्या दोघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करायचे होते. मात्र, ऐनवेळी पोलिस जीपमध्ये बिघाड झाल्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक दीपिका जौंजाळ यांच्यासह पोलिस कर्मचाºयांनी दोन्ही आरोपींना कºहाड शहर पोलिस ठाण्यातून शाहू चौक, दत्त चौक, यशवंत हायस्कूलमार्गे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत चालवत नेले. न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा दोघांनाही त्याच मार्गाने मुख्य बाजारपेठेतून परत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. ‘खाकी’वर हात उचलणाºया त्या दोघांची धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सहायक निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत.
एक दिवस पोलिस कोठडीअटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी दुपारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कºहाड येथे सोमवारी पोलिसांना मारहाण करणाºया आरोपींना पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतून धिंड काढून चालवत न्यायालयामध्ये नेले.

Web Title: Threats from the big market of police raising arms! The crowd watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.