कऱ्हाडात 'स्वाभिमानी'चे गाडी ढकलो आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध : प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:43 PM2018-05-23T13:43:59+5:302018-05-23T13:43:59+5:30

इंधन दरवाढ करून अच्छे दिन दाखवल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी दुपारी कऱ्हाडात टाऊन हॉल परिसर ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पायी दुचाकी गाडी ढकलून निषेध आंदोलन केले.

'Swabhimani' car rolled up in Karhad, protest of fuel price hike: administration request | कऱ्हाडात 'स्वाभिमानी'चे गाडी ढकलो आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध : प्रशासनास निवेदन

कऱ्हाडात 'स्वाभिमानी'चे गाडी ढकलो आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध : प्रशासनास निवेदन

Next
ठळक मुद्देकऱ्हाडात 'स्वाभिमानी'चे गाडी ढकलो आंदोलन इंधन दरवाढीचा निषेध : प्रशासनास निवेदन

कऱ्हाड : इंधन दरवाढ करून अच्छे दिन दाखवल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी दुपारी कऱ्हाडात टाऊन हॉल परिसर ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पायी दुचाकी गाडी ढकलून निषेध आंदोलन केले.

सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ केल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या राज्य व केंद्र सरकारला आपल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पायी दुचाकी गाडी ढकलून निषेध आंदोलन केले.

यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिलबापू घराळ, सुभाष नलवडे, योगेश झांबरे, रोहित पाटील, विनायक जाधव, रामचंद्र बोराटे, तुषार साळुंखे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन नलवडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

इंधन दरवाढ विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथून एसटी बसस्थानक परिसर ते दत्त चौकपासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी गाडी ढकलो आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारचा निषेध असो, कुठे गेले अच्छे दिन, अशा घोषणा दिल्या.

Web Title: 'Swabhimani' car rolled up in Karhad, protest of fuel price hike: administration request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.