राज्यातील ५१ गडकोट होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:00 AM2019-04-22T01:00:36+5:302019-04-22T01:00:52+5:30

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्यासाठी गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार ...

The state will be a 'State Protected Monument' | राज्यातील ५१ गडकोट होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’

राज्यातील ५१ गडकोट होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’

Next

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्यासाठी गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ५१, तर जिल्ह्यातील १५ गडकोटांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात येणार असून, याबाबतची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.
साताऱ्यात मंदिरे, गडकोट, इमारती, स्मारके यांसह विविध वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत; परंतु जाज्वल्य पराक्रमाचे साक्षीदार असलेले जिल्ह्यातील बहुतांश गड, किल्ले संवर्धनाअभावी अखेरची घटका मोजत आहेत.
गेली अनेक वर्षे देखभाल, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या गडकोटांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभाग यांच्या समन्वयाने गडकोटांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ८३ किल्ल्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यापैकी ५१ गडकोटांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले जाणार आहे. या ५१ गडकोटांमध्ये सातारा जिल्ह्यातील १५ गटकोटांचा समावेश आहे. साताºयासह पुणे, नगर, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील गडकोटांचाही यामध्ये समावेश आहे. या निर्णयामुळे उपेक्षित गडकोटांच्या जतन-संवर्धनाचा मार्ग सुकर होणार असून, याबातची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.

संरक्षित स्मारक म्हणजे काय?
महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी काही महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारके म्हटले जाते. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत केले जाते. संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये, यासाठी ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आता गटकोटांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर व हानी पोहोचविणाºयांवर चाप बसणार आहे.
या किल्ल्यांचा समावेश
चंदन-वंदन, वैराटगड, पांडवगड, अजिंक्यतारा, वारुगड, संतोषगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, दातेगड, कमळगड, वासोटा, नांदगिरी, केंजळगड, भैरवगड.

Web Title: The state will be a 'State Protected Monument'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.