जंगलातून शाळेत जाताना चिंधी ठरली दिशादर्शक - पळ्याचा वाडा शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:41 AM2019-01-25T00:41:05+5:302019-01-25T00:42:15+5:30

एकीकडे फलटण तालुक्यातील उजाड माळरानातून थेट किर्रर्र झाडी असलेल्या भागातील डोंगरावरील शाळा... पावसाळ्यात डोक्यावर कोसळणारा पाऊस आणि पायाखालची लाल सटकणारी माती... त्यात घनदाट झाडीमुळे रोज जंगलात वाट चुकणं... समोर आलेल्या या परिस्थितीला आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि लढायचं ठरवलं. जिथून आपण

Shastri school going from school to school | जंगलातून शाळेत जाताना चिंधी ठरली दिशादर्शक - पळ्याचा वाडा शाळा

जंगलातून शाळेत जाताना चिंधी ठरली दिशादर्शक - पळ्याचा वाडा शाळा

googlenewsNext
ठळक मुद्देकोसळणाऱ्या पावसात वनातून एकल प्रवास--शिक्षण यात्री

प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : एकीकडे फलटण तालुक्यातील उजाड माळरानातून थेट किर्रर्र झाडी असलेल्या भागातील डोंगरावरील शाळा... पावसाळ्यात डोक्यावर कोसळणारा पाऊस आणि पायाखालची लाल सटकणारी माती... त्यात घनदाट झाडीमुळे रोज जंगलात वाट चुकणं... समोर आलेल्या या परिस्थितीला आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि लढायचं ठरवलं. जिथून आपण रस्ता हमखास चुकतोय तिथं डोक्याचा स्कार्फ फाडून झाडांना बांधला आणि तयार केला स्वत:च स्वत:साठी दिशादर्शक फलक!
पाटण तालुक्यातील पळ्याचा वाडा ही शाळा डोंगरावर आहे. डोंगराच्या पायथ्याला गाडी लावून सुमारे दीड किलोमीटरची चढाई केल्यानंतर गावाच्या शेवटच्या टोकावर ही शाळा येते. शाळेचा पटही जेमतेम आहे. वाट्याला आलेली शेती कसण्याचं काम येथील वयस्क आणि महिला करतात, तर तरणीपोरं मुंबईला नोकरीसाठी जातात. डोंगरावर जाण्याचा सराव येथील ग्रामस्थांना आहे. मात्र, ज्यांनी कायम उजाड माळरान बघितले अशा फलटण भागातील शिक्षिका हेमा भोईटे यांच्यासाठी ही शाळा आणि परिसर म्हणजे अगदी विरुद्ध टोकचं होतं. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारण्याचं ठरवून या शाळेत हजर झाल्या. पहिले काही दिवस त्या शाळेकडे जाणारा रस्ता चुकायच्या आणि किर्रर्र झाडीत हरवून जायच्या. मोबाईलला रेंज नाही की जंगलात माणसं नाहीत. आठवडाभर हा खेळ झाल्यानंतर त्यांनी त्यांचा स्कार्फ फाडला आणि तो चुकणाºया वळणावरील झाडाला बांधला. त्यानंतर त्या रस्ता चुकल्या नाहीत. पहिल्या कोसळणाºया पावसात त्या आजारीही पडल्या; पण या सर्व परिस्थितीवर मात करून त्यांनी विद्यार्थी शिक्षणाचे काम केले. नियमीत आणि वेळेत शाळेत येणं आणि विद्यार्थ्यांना शिकविणं हा त्यांचा क्रम राहिला. त्याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना टापटीप राहण्यासाठीही विशेष प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच आज तेथील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच वागण्या बोलण्यातही तरबेज झाले.

घनदाट झाडीत जंगली श्वापदांची भीती
पळ्याचा वाडा शाळेत पोहोचण्यासाठी शिक्षकांना रोज सुमारे दीड किलोमीटर घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो. या परिसरात जंगली श्वापदांचा वावर आहे. स्थानिकांना याची माहिती असल्याने ते सावधपणे या मार्गावरून प्रवास करतात; पण शिक्षिकांना एकटं हा प्रवास करणं धोक्याचं आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात देवी दर्शनासाठी येणारे किंवा पर्यटक म्हणून येणारे लोक झाडीच्या आडोशाला मद्यपानही करतात. शाळा सुटल्यानंतर परतीच्या प्रवासात हे पर्यटक शिक्षिकांचा थरकाप उडवतात. त्यांच्या या सुरक्षिततेचा विचार कुठेच झाला नाही.
पळ्याचा वाडा येथे पटसंख्या मर्यादित आहे. तरीही येथे शाळा सुरू आहे. शिक्षकही रोज डोंगर चढून येथे अध्यापनाचे काम करत आहेत. भविष्यात कमवणारा म्हणून मुलांच्या शिक्षणाकडे पालक लक्ष देतात; पण घरापासून शाळा दूर असली तर मुलींचं शिक्षण बंद हाच पर्याय पालकांना दिसतो. त्यामुळे त्रास सहन करून शिक्षक येथे येतात.
- प्रदीप घाडगे, केंद्र प्रमुख, पाटण

डोंगर चढणं अन् उतरणं दोन्ही जिकिरीचं
पळ्याचा वाडा शाळेत जाण्यासाठी डोगर चढणं जेवढं जिकिरीचं आणि तेवढचं ते उतरणंही कसबीचं काम आहे. तीव्र चढ असल्यामुळे डोंगर चढताना धाप लागते. तर उतरताना लाल माती घसरडी असल्यामुळे पडण्याची भीती असते. पावसाळ्यात तर १५ आॅगस्टचा कार्यक्रम उरकून निघालेली ही शिक्षिका या रस्त्यावरून घसरून पडली. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापतही झाली. सुमारे दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पाटण तालुक्यातील पळ्याचा वाडा या डोंगरी शाळेत जाण्यासाठी शिक्षिकेला घनदाट जंगलातून जावे लागते.

Web Title: Shastri school going from school to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.