मराठी शाळेत शिक्षणाबरोबरच संस्कार : मकरंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:09 PM2017-10-08T14:09:23+5:302017-10-08T14:09:41+5:30

इंग्रजी शाळांचं पेव वाढत असताना मराठी शाळा टिकण्यासाठी शिक्षणाचा दर्जा चांगला राखण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. मराठी शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्काराची जोड दिली जाते. त्यामुळे नुसते शिक्षण घेऊन चालणार नाही, तर सुसंस्कारित पिढी घडविणेही काळाची गरज आहे. हे काम मराठी शाळा करीत असतात, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

Sanskars along with education in Marathi school: Makrand Patil | मराठी शाळेत शिक्षणाबरोबरच संस्कार : मकरंद पाटील

मराठी शाळेत शिक्षणाबरोबरच संस्कार : मकरंद पाटील

Next

खंडाळा : इंग्रजी शाळांचं पेव वाढत असताना मराठी शाळा टिकण्यासाठी शिक्षणाचा दर्जा चांगला राखण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. मराठी शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्काराची जोड दिली जाते. त्यामुळे नुसते शिक्षण घेऊन चालणार नाही, तर सुसंस्कारित पिढी घडविणेही काळाची गरज आहे. हे काम मराठी शाळा करीत असतात, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.


खंडाळा येथे पंचायत समितीच्या आदर्श शिक्षक गुणगौरव समारंभात आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्रमुख वक्ते इंद्रजित देशमुख, शिक्षण समिती सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, पंचायत समिती सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, शोभा जाधव, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव उपस्थित होते.


आमदार पाटील म्हणाले, खंडाळा पंचायत समिती व शिक्षण विभागाने तालुक्यातील शिक्षणाचा स्तर उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांचा होणारा गुणगौरव त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे गुणवंत शिक्षकांचा गौरव झाला पाहिजे.


यावेळी शिक्षण समितीवरील निमंत्रित सदस्य नवनाथ भरगुडे, जिल्हास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संगीता पवार, आदर्श केंद्र प्रमुख चंद्रकांत धायगुडे, आदर्श शिक्षक हणमंत बोराटे, शिल्पा भोसले, हसिना पटेल, भगवान चव्हाण, बाळकृष्ण धायगुडे, संगीता कुंभार, नवनाथ काशीद, दत्तात्रय वाघ, प्रकाश जाधव, पल्लवी रासकर, अंजना जगताप , पद्मजा नरुटे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी दीपा बापट, गटशिक्षणाधिकारी अलका मुळीक, माजी सभापती प्रा. एस. वाय. पवार, लता नरुटे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, बाळासाहेब साळुंखे, नगरसेवक योगेश क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, अजय भोसले, गणेश धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सभापती मकरंद मोटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
 

Web Title: Sanskars along with education in Marathi school: Makrand Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.