समर्थांचे ‘रामघळ’ विकासाच्या प्रतीक्षेत : पर्यटन विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:16 AM2018-05-12T00:16:30+5:302018-05-12T00:16:30+5:30

 Samarth's 'Ramghal' awaiting development: Neglect of tourism department | समर्थांचे ‘रामघळ’ विकासाच्या प्रतीक्षेत : पर्यटन विभागाचे दुर्लक्ष

समर्थांचे ‘रामघळ’ विकासाच्या प्रतीक्षेत : पर्यटन विभागाचे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देरस्ता, पिण्याच्या पाण्याची गैरसोय; शासनाबाबत पर्यटकांकडून नाराजी

हणमंत यादव ।
चाफळ : तीनशे पासष्ठ वर्षांचा इतिहास लाभलेल्या व पर्यटनस्थळ तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा मिळालेल्या चाफळ विभागातील सडादाढोली जवळील रामघळ कुबडीतीर्थाचा निधीअभावी विकास खुंटला
आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची व राहण्याची गैरसोय, स्वच्छतागृहांचा अभाव
अशा एक ना अनेक समस्यांच्यागर्तेत हे पर्यटनस्थळ अडकलेआहे.

या ठिकाणच्या समस्यांमुळे पर्यटकांसह भाविकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटन विभागाने येथील विकासासाठी निधी देऊन प्रलंबित विकास कामे मार्गी लावावी, अशी मागणी पर्यटक, भाविकांतून
होत आहे.

चाफळच्या पश्चिमेस उंच डोंगर कपारीत चाफळपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर ‘रामघळ-कुबडीतीर्थ’ हे पर्यटनस्थळ आहे. ही घळ समर्थ रामदासांनी स्वत: बनवली असल्याने तिला अनन्यसाधारण
महत्त्व आहे.उंच महाकाय डोंगराच्या कड्यात निसर्गसौंदर्यात रामघळ वसले
आहे. गत दहा वर्षांपूर्वी या ठिकाणास प्रशासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा ‘क’ वर्ग दर्जा दिलाआहे.तसेच येथील रस्त्यासह उर्वरित विकासकामांसाठी भरघोस निधीही दिला होता. या निधीतून रामघळ परिसराच्या विकासाबरोबर रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, विकासकामांना अजून निधी न मिळाल्याने सध्या येथील विकास खुंटला आहे.समर्थांच्या वास्तवाने पावन झालेल्या या अनमोल ठेव्याचे जतन करून परिसराच्या विकासाच्या दृष्टीने येथे पर्यटन विभागाने निधीदेणे गरजेचे आहे. यासाठी येथील देवस्थान ट्रस्ट व सडावाघापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंचनथुराम झोरे प्रयत्न करीत असून, येथील विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी जोर धरूलागली आहे.

तीर्थक्षेत्र रामघळ या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामार्इंच्या मूर्तीसह वसंतगड येथील जनार्दन महाराजांची सुंदरशी प्रतिकृती ट्रस्टच्यामाध्यमातून बसविण्यात आलीआहे. येथून जवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या सडादाढोली गावचेग्रामस्थ व देवस्थान ट्रस्ट्र येथे समर्थ रामदास स्वामी व जर्नादन महाराजांच्या
पुण्य भेटीचा सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात साजरा केलाजातो.

विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी पायी प्रवास
रामघळीपासून शंभर मीटरच्या हाकेच्या अंतरावर सडादाढोली हे ३०० लोकसंख्येचे एक छोटंसं गाव आहे. गावात रस्त्याअभावी बस येत नसल्याने येथे येणाºया पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांना दाढोलीपर्यंत पायी चालत जावे लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता नसल्याने दहावीनंतर पुढील शिक्षण सोडून मुलांना मुंबईस कामास पाठवण्यात येथील पालक धन्यता मानत आहेत.

कुबडीतीर्थासह झºयाचा विकास महत्त्वाचा...
रामघळीपासून जवळच समर्थ रामदासांनी स्वत: हातातील कुबडीने दगड बाजूला करत निर्माण केलेला पाण्याचा झरा आहे. त्यास ‘कुबडीतीर्थ’ या नावाने ओळखले जाते. सध्या सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक नानाविध उपक्रम राबवले जात आहेत. परंतु निसर्गाचा अनमोल ठेवा व बारमाही पाण्याच्या झºयाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. याच झºयाचे पाणी सडादाढोली येथील ग्रामस्थ बारमाही वापरत असतात. त्याचेही जतन होणे काळाची गरज आहे.
 

आजारी व्यक्तींचे अतोनात हाल..
येथील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास खराब रस्ता असूनही वाहनधारक गावात येण्यास तयार होत नाहीत. परिणामी आजारी रुग्णास डोलीतून रुग्णालयापर्यंत न्यावे लागत आहे. ही येथील वस्तुस्थिती आहे. यासाठी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे.

Web Title:  Samarth's 'Ramghal' awaiting development: Neglect of tourism department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.