भाजपच्या माजी पदाधिकाºयावर खंडणीचा गुन्हा -जुगार अड्ड्यावर दहाजण सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:07 AM2019-04-11T11:07:39+5:302019-04-11T11:13:44+5:30

मटका व्यावसायिकाकडे  महिन्याला तीस हजार रुपये हप्ता मागितल्याच्या आरोपावरून भाजपच्या माजी पदाधिकाºयावर शहर पोलीस ठाण्यात खंडणी,जबरी चोरी आणि

Ransom offense against former BJP executive | भाजपच्या माजी पदाधिकाºयावर खंडणीचा गुन्हा -जुगार अड्ड्यावर दहाजण सापडले

भाजपच्या माजी पदाधिकाºयावर खंडणीचा गुन्हा -जुगार अड्ड्यावर दहाजण सापडले

Next
ठळक मुद्देमटका सुरू  ठेवण्यासाठी ३० हजार मागितल्याचा ठपका

2 crime news

सातारा : मटका व्यावसायिकाकडे  महिन्याला तीस हजार रुपये हप्ता मागितल्याच्या आरोपावरून भाजपच्या माजी पदाधिकाºयावर शहर पोलीस ठाण्यात खंडणी,जबरी चोरी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील काळेकर (वय ३२, रा. रविवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या माजी शहर अध्यक्षाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जमाल पठाण (रा. मेढा, ता. जावळी) हा मटका व्यावसायिक  जब्बार जमाल पठाण याच्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका घेत होता. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास भूविकास चौकामधून काळेकरने त्याचे कारमधून अपहरण केले. कारमध्ये बसल्यानंतर जब्बार पठाण याला फोन करण्यास सांगितले. मात्र, जब्बार पठाणला फोन लागला नाही. त्यामुळे काळेकरने गाडीतील चाकू काढून त्याला धाक दाखविला. मटका धंदा सुरू ठेवायचा असेल तर दरमहा तीस हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करून त्याने पठाणच्या खिशातील  ४ हजार ५०० रुपयाची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत जमाल पठाणने  फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सुनील काळेकरवर गुन्हा दाखल केला.

 

साताºयात जुगार अड्ड्यावर दहाजण सापडले
एक  लाख ५२ हजारांचा ऐवज जप्त 

सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाशेजारील एका बिर्याणी हाउसच्या पाठीमागे सुरू असणाºया जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ५२ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.
नितीन रमेश कांबळे (वय २५, रा. कृष्णानगर खेड), ऋषीकेश संतोष सांडभोर (वय २२, रा. शाहूपुरी मटका मालक), अनिल रामचंद्र कोळी (वय ३०, रा. गेंडामाळ परिसर), विजय दत्तू लोंढे (रा. सातारा), संजय शिक्राप्पा कांबळे (वय ३५, रा. सदर बझार सातारा), अफजल मुस्ताकीम मनीहार (वय ३८,रा. पिरवाडी खेड, सातारा), पांडुरंग खाशाबा लोखंडे (वय ७०ख रा. कृष्णानगर, खेड सातारा), शंकर संपत राम (वय ४०, रा. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा), विलास अमृत जाधव (वय ४२, रा. खेड), अरूण कृष्णा सपकाळ (वय ५०, रा. कृष्णानगर, सातारा) अशी अटक ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे २० हजारांची रोकड आणि दोन दुचाकी तसेच जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

 

Web Title: Ransom offense against former BJP executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.