वटवृक्षांवर घाला... सावली हरपली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:32 AM2017-11-03T11:32:30+5:302017-11-03T11:45:47+5:30

वृक्षलागवड व संर्वधनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात असताना साताºयात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला असलेले भले मोठे वृक्ष धोकादायक ठरवून ते तोडले जात आहेत. बुधवार नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरील अनेक वटवृक्ष आजपर्यंत तोडण्यात आले असून, हक्काची सावली हरपली असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Put on the trees ... the shadow disappears! | वटवृक्षांवर घाला... सावली हरपली !

वटवृक्षांवर घाला... सावली हरपली !

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींमधून नाराजीबुधवार नाका-मोळाचा ओढा मार्ग झाला सुनासुना
नलाईन लोकमतसातारा : वृक्षलागवड व संर्वधनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात असताना साताºयात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला असलेले भले मोठे वृक्ष धोकादायक ठरवून ते तोडले जात आहेत. बुधवार नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरील अनेक वटवृक्ष आजपर्यंत तोडण्यात आले असून, हक्काची सावली हरपली असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मध्यवर्ती बसस्थानक ते मोळाचा ओढा या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरणाला अडथळा ठरणारे अनेक वृक्ष प्रशासनाच्या वतीने तोडण्यात आले आहेत. मात्र, आजही वृक्षांची कत्तल सुरूच आहे. जुन्या वटवृक्षांना धोकादायक ठरवून त्यांच्यावर घाला घातला जात आहे. आजपर्यंत अनेक वटवृक्ष धोकादायक ठरवून व रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.एकीकडे वृक्षसंवर्धनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, साताºयात रुंदीकरणाच्या नावाखाली व वृक्षांना धोकादायक ठरवून त्यांच्यावर घाला घातला जात आहे. वृक्षलागवड व संवर्धन ही काळाची गरज असून, प्रशासनाच्या वतीने या मार्गावर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांमधून होत आहे.रस्त्याचे बदलले रूपदुतर्फा असलेल्या वृक्षांमुळे या मार्गवरून प्रवास करताना प्रवासी व नागरिकांना सुखकर वाटत होते. पादचाºयांनाही वृक्षांमुळे हक्काची सावली मिळत होती. मात्र, वृक्षतोडीमुळे बसस्थानक ते मोळाचा ओढा या मार्गाचे रुपडेच बदलून गेले आहे. पादचाºयांना वर्षानुवर्षे सावली देणारी झाडेच आता नष्ट झाल्याने हक्काची सावली हरपली आहे. अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Put on the trees ... the shadow disappears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.