विद्यानगरात नववधूसह माता-पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:45 PM2019-04-12T23:45:00+5:302019-04-12T23:45:06+5:30

कºहाड : नवविवाहित मुलीसह तिच्या आई-वडिलांनी राहत्या घरी आत्महत्या केली. विद्यानगर-सैदापूर (ता. कºहाड) येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ...

Parents commit suicide in the university | विद्यानगरात नववधूसह माता-पित्याची आत्महत्या

विद्यानगरात नववधूसह माता-पित्याची आत्महत्या

Next

कºहाड : नवविवाहित मुलीसह तिच्या आई-वडिलांनी राहत्या घरी आत्महत्या केली. विद्यानगर-सैदापूर (ता. कºहाड) येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शिवाजी आनंदा मोहिते (वय ५९), बेबी शिवाजी मोहिते (५२) आणि वृषाली विकास भोईटे (२४) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाड तालुक्यातील उंब्रज येथील मोहिते कुटुंबीय अनेक महिन्यांपासून विद्यानगर येथे गाडगे महाराज महाविद्यालया-मागील गुरुदत्त कॉलनीत वास्तव्यास होते. कॉलनीत त्यांचा छोटेखानी बंगला आहे. शिवाजी यांचा मुलगा विराज हा पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे, तर मुलगी वृषालीचा दोन महिन्यांपूर्वी ९ फेब्रुवारी २०१९ रोजी विवाह झाला होता. वाघोली-वाठार स्टेशन हे वृषालीचे सासर आहे. विवाहानंतर काही दिवसांनी वृषाली माहेरी विद्यानगर येथे आई-वडिलांकडे राहण्यास आली होती.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी वृषालीने विषारी (पान १ वरून)
औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे वडील शिवाजी व आई बेबी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पुण्यात असलेल्या विराजला फोन करून याबाबतची माहिती दिली. विराजने विद्यानगर येथील त्याच्या मित्रांना फोन करून तातडीने घरी जाण्यास सांगितले. तसेच तोही पुण्यातून कºहाडला येण्यासाठी निघाला. काही वेळातच त्याचे मित्र घरी पोहोचले. त्यावेळी घरातील सोफ्यावर वृषाली मृतावस्थेत पडल्याचे त्यांना दिसले. तर शिवाजी व बेबी यांनी घरातील फॅनच्या हुकला एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित युवकांनी याबाबतची माहिती कºहाड शहर पोलिसांत दिली.
माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. घटनेची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे.
-----------
कारण कौटुंबिक की आणखी काही?
शिवाजी, बेबी आणि त्यांची मुलगी वृषाली यांच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. कौटुंबिक वादातून की आणखी कोणत्या कारणातून या तिघांनी आत्महत्या केली, हे नातेवाइकांचे जबाब घेतल्यानंतरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. तसेच सर्व शक्यता गृहित धरून या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.

Web Title: Parents commit suicide in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.