प्रतापगडच्या संवर्धनासाठी शंभर काेटींचा आराखडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:36 PM2024-01-29T12:36:01+5:302024-01-29T12:36:38+5:30

पार येथे दुर्ग रायरेश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहिमेची सांगता

One hundred crore scheme for the conservation of Pratapgad, Chief Minister Eknath Shinde testified | प्रतापगडच्या संवर्धनासाठी शंभर काेटींचा आराखडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही 

प्रतापगडच्या संवर्धनासाठी शंभर काेटींचा आराखडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही 

सातारा : किल्ले प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

दुर्ग रायरेश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभ पार, ता. महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. महेश लांडगे, आ. नितेश राणे, संभाजी भिडे गुरुजी, उद्योजक भावेश भाटिया, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, रायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याने मंदिराला वेगळे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान वारसा तरुण पिढीला कळावा, यादृष्टीने अशा गडकोट मोहिमा महत्त्वाच्या आहेत. गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन याला केंद्र आणि राज्य शासनाने प्राधान्य देणार आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प सर्व मिळून साकार करूया, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी प्रदीप बाफना यांनी मनोगत व्यक्त केले. रावसाहेब देसाई यांनी प्रास्ताविक केले. संजय जठार यांनी आभार मानले. मोहिमेमध्ये सहभागी करून पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.

Web Title: One hundred crore scheme for the conservation of Pratapgad, Chief Minister Eknath Shinde testified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.