‘पदवीधर’साठी ‘मायक्रोप्लॅनिंग’ : कऱ्हाडातील दोन नेते भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:44 AM2018-06-08T00:44:35+5:302018-06-08T00:44:35+5:30

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी बाकी

 'Microplaning' for 'Graduate': Two leaders from Karhad will fight | ‘पदवीधर’साठी ‘मायक्रोप्लॅनिंग’ : कऱ्हाडातील दोन नेते भिडणार

‘पदवीधर’साठी ‘मायक्रोप्लॅनिंग’ : कऱ्हाडातील दोन नेते भिडणार

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी, भाजपकडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम

सागर गुजर।
सातारा : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी बाकी असला तरी राष्ट्रवादी व भाजपने मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला जोरदार सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी मायक्रोप्लॅनिंग केले आहे.

राष्ट्रवादीकडून सारंग पाटील तर भाजपकडून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर हे दोघे संभाव्य उमेदवार मानले जातात. दोन्ही नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे पदवीधर मतदार संघात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत.

या पाचही जिल्ह्यांमध्ये इच्छुकांचे दौरे सुरू आहेत.या मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महसूल खात्याचे मंत्रिपद दिले आहे. पाटील यांची मुदत जुलै २०१९ मध्ये संपत आहे. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणारी आहे. चंद्रकांत पाटील हे सलग दोनवेळा या मतदार संघातून निवडून गेले आहेत. मागील निवडणूक २०१४ मध्ये झाली. भाजपचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे सारंग पाटील व राष्ट्रवादीचे बंडखोर अरुण लाड यांच्यात तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीची मते फुटल्याने सारंग पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

सत्तेत असताना राष्ट्रवादीला बंडखोरी रोखता आली नव्हती, आता सत्तेबाहेर असणारी राष्ट्रवादी या निवडणुकीत एकसंध राहणार का? पुन्हा बंडखोरीचे वादळ घुमणार? यावरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा जय-पराजय अवलंबून ठरणार आहे.

दरम्यान, सारंग पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली आहे. साताºयात नुकताच युवक राष्ट्रवादी काँगे्रसचा मेळावा झाला. या मेळाव्यात पाटील यांनी हजेरी लावून एकसंध राहण्याचे आवाहन केले. दुसऱ्या बाजूला सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनीही कºहाड तालुक्यात मतदान नोंदणीवर भर दिला आहे.

पतसंस्थांवरही टार्गेट
साताºयासह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या पाच जिल्ह्यांमध्ये पतसंस्थेचे मोठे जाळे आहे. या पतसंस्थांतील कर्मचाºयांना मतदार नोंदणीचे टार्गेट पक्ष नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे पतसंस्थेतील व्यवहारांसोबतच ‘ग्रॅज्युएट’ युवक-युवतींच्या मतदार नोंदणीचे कामही कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.

चंद्रकांत पाटील लढणार सार्वत्रिक निवडणूक
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पक्ष ज्या ठिकाणी तिकीट देईल, तिथून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 

अशी करता येईल नोंदणी
या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू व्हायला कालावधी असला तरी २०१९ पूर्वी दोन वर्षे पदवी धारण केलेल्या युवक-युवतींना मतदार नोंदणी करता येऊ शकेल. युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, ओळखपत्र व मतदार नोंदणीचा फॉर्म भरून तो तहसीलदार कार्यालयात जमा करून मतदार नोंदणी करता येणार आहे.

Web Title:  'Microplaning' for 'Graduate': Two leaders from Karhad will fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.