सदस्यांना योजनांची माहितीच मिळेना-कºहाड पंचायत समिती सभा : अधिकाऱ्यांवर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:22 PM2019-03-13T22:22:50+5:302019-03-13T22:23:47+5:30

शासनाच्या अनेक योजना येतात कधी अन् त्याचा लाभ कोणाकोणाला दिला जातो, याची माहितीच सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे योजना नुसत्या नावाला माहिती पडेना सदस्यांना, असे चित्र सध्या कºहाड

Members get information about the schemes: Hade Panchayat Samiti meeting: | सदस्यांना योजनांची माहितीच मिळेना-कºहाड पंचायत समिती सभा : अधिकाऱ्यांवर ताशेरे

सदस्यांना योजनांची माहितीच मिळेना-कºहाड पंचायत समिती सभा : अधिकाऱ्यांवर ताशेरे

Next
ठळक मुद्देपशुसंवर्धन, पाणीपुरवठा विभागाची झाडाझडती

कºहाड : ‘शासनाच्या अनेक योजना येतात कधी अन् त्याचा लाभ कोणाकोणाला दिला जातो, याची माहितीच सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे योजना नुसत्या नावाला माहिती पडेना सदस्यांना, असे चित्र सध्या कºहाड पंचायत समितीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे योजनांची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांनी यापुढे माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्याकडे बघावे लागेल,’ असे मत सदस्यांनी मासिक सभेत व्यक्त केले.

कºहाड पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती फरिदा इनामदार होत्या. उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी पशुसंवर्धन, पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांवर ताशेरे ओढण्यात आली. पशुसंवर्धन विभागाच्या संबंधित अधिकाºयांनी विभागाचा आढावा सादर केला. यावेळी सदस्य देशमुख यांनी पशुसंवर्धन विभाग स्वयंघोषित आहे. विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनांची कोणतीच माहिती सदस्यांना दिली जात नसल्याचे सांगितले. यावर मनव येथील साथरोगातील डॉक्टर व इतर पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर यांची चौकशी करण्याचा ठराव घेऊन तो मंत्रालयात पाठविण्यात यावा, अशा सूचना उपसभापतींनी केल्या.

यानंतर उपअभियंते सुनील आडके यांनी पाणी पुरवठा विभागाचा आढावा सादर केला. ते म्हणाले, ग्रामीण पाणी पुरवठ्याची एकूण १६ कामे आहेत. त्यातील दोन कामे पूर्ण झाली असून, १२ कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली. यावर सदस्यांनी २०११ पासून टंचाई घोषित किती गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करीत त्यांना योजनेचा लाभ दिला गेला? असा प्रश्न आडके यांना विचारत पाणी टंचाईच्या प्रश्नावर धारेवर धरले. दरम्यान सदस्य अ‍ॅड. शरद पोळ यांनी मनवला लाळ साथीचा विषय उपस्थित करीत संबंधित डॉक्टर पाटील यांना जबाबदार धरायचे का? असा सवाल उपस्थित केला. यावर सभापती इनामदार यांनी नुकसानीस संबंधित डॉक्टर जबाबदार असून, ते नुकसान भरपाई देतील, असे सांगितले.दरम्यान, मासिक सभेत एकात्मिक बालविकास, शिक्षण, कृषी, पाणी पुरवठा विभागातील अधिकाºयांनी आढावा सादर केला.

सदस्यांना केवळ फोटोसाठी निमंत्रण
ज्यावेळी एखादा कार्यक्रम घ्यायचा असतो, त्या कार्यक्रमाचे आॅनलाईन फोटो पाठवायचे असतात. त्यावेळी स्थानिक ठिकाणी असलेल्या पंचायत समिती सदस्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाते. त्यांच्यासोबत कार्यक्रमात फोटो काढून ते वरिष्ठांकडे पाठविले जातात. मात्र, त्या कार्यक्रमानंतर त्या विभागातील इतर योजनांची माहिती काही सदस्यांना दिली जात नाही, अशीही माहिती मासिक सभेवेळी काही सदस्यांनी दिली.
कºहाडला ३८ गावे टंचाईग्रस्त


सभेवेळी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील आडके यांनी कºहाड तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘कºहाड तालुक्यात एकूण ३८ गावे टंचाईग्रस्त असल्याची माहिती आतापर्यंत मिळाली असून, त्या ठिकाणी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. या गावांतील बारा गावांतून टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल झालेले आहेत.’
 

कडबाकुट्टीचा घोटाळा माहितीय; पण योजना नाही
कºहाड पंचायत समितीत काम करताना आता योजनेचे अर्ज कसे भरावे, हेच कळत नाही. त्यांची माहिती सर्वांनी आता अधिकाºयांकडे मागूया. योजनेचे अर्ज कधी आले तसेच त्याचा लाभ कसा लाभार्थ्यांना दिला गेला, याची माहितीच कोणाला दिली जात नाही. कडबाकुटीचा घोटाळ्याची माहिती मला होती. योजनेची मात्र, माहिती नव्हती, अशी माहिती उपसभापती सुहास बोराटे यांनी कºहाड पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली.
 

योजनांचा लाभ केवळ झेडपी सदस्यांनाच का?
कºहाड पंचायत समितीत पशुसंवर्धन, कृषी विभाग तसेच इतर विभागांमध्ये ज्या काही योजना येतात. त्या योजनांचा लाभ हा जिल्हा परिषद सदस्यांनाच दिला जातोय. त्यांच्या शिफारशीशिवाय योजनेचा फॉर्म ग्राह्य धरला जात नाही, अशी माहिती सदस्यांनी सेभत दिली. तसेच योजनांचा लाभ हा पंचायत समिती सदस्यांना न देता तो झेडपीच्याच सदस्यांना का दिला जातो? असा सवालही सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.

Web Title: Members get information about the schemes: Hade Panchayat Samiti meeting:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.