विशेष मुलांच्या आॅलिम्पिकमध्ये मनालीची ‘सुवर्ण’ कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:03 AM2019-03-31T01:03:06+5:302019-03-31T01:03:41+5:30

प्रत्येकाला आपलं मूल, भाच्चा, भाजी, पुतण्या छान गुटगुटीत सगळ्यांसारखं हसणारं, खेळणारं असावं असं वाटतं; पण तेच मूल सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळं विशेष असेल तर कोणाला कल्पनाही करवत नाही; पण अनेकांना हे माहितीच नसतं की ही मुलंच जगावेगळी असतात.

Manali's 'gold' performance in Special Children's Olympics | विशेष मुलांच्या आॅलिम्पिकमध्ये मनालीची ‘सुवर्ण’ कामगिरी

विशेष मुलांच्या आॅलिम्पिकमध्ये मनालीची ‘सुवर्ण’ कामगिरी

googlenewsNext
ठळक मुद्देपॉवरलिफ्टिंगमध्ये दबदबा । बेंचप्रेसमध्ये सुवर्ण तर स्काँट, डेडलिफ्ट व कम्बाइन्ड प्रकारात तीन कांस्यपदकांची मानकरी

जगदीश कोष्टी ।
सातारा : प्रत्येकाला आपलं मूल, भाच्चा, भाजी, पुतण्या छान गुटगुटीत सगळ्यांसारखं हसणारं, खेळणारं असावं असं वाटतं; पण तेच मूल सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळं विशेष असेल तर कोणाला कल्पनाही करवत नाही; पण अनेकांना हे माहितीच नसतं की ही मुलंच जगावेगळी असतात. त्यांना त्यांच्या स्वभावानुसार क्षेत्र दिलं तर ‘कुछ भी कर सकते हैं,’ हे करून दाखविलं मानली शेळके हिने. विशेष मुलांसाठी घेतल्या जात असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत मनाली शेळकेने सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई केली.

साताऱ्यात जाधव कुटुंबात २९ मार्च १९९९ रोजी मनालीचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर मामा-मामीच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती; पण हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याला चिंतेची किनार लागली. मनाली सर्वसामान्य मुलीसारखी नव्हती. डॉक्टरांच्या मते ती विशेष लक्षणासह मोठी होणार होती. आनंदाची जागा काळजीने घेरली. तिची आई चिंतेने व्याकूळ होऊन गेली. वडिलांपुढे संघर्षाचे चित्र उभे राहिले. शेळके-जाधव परिवारात अस्वस्थता वाढली.
डॉक्टर आणि मित्रपरिवाराने समजूत घालत धीर द्यायचा प्रयत्न केला. या संकटातून मार्ग काढत मनालीचे जगणे सुंदर करण्याचा चंग बांधला. आई-वडिलांनी निश्चय केला, तो क्षण केवळ मनालीच्याच नव्हे तर शेळके, जाधव कुटुंबीय, मित्रपरिवार आणि देशातील विशेष जगताला कलाटणी देणारा व अभिमानास्पद ठरला. शाळेतील शिक्षकांनी तिच्यातील गुण हेरले. मनालीला पॉवरलिफ्टिंगमध्ये रस निर्माण होऊ शकतो. हे लक्षात आले अन् गगनाला गवसणी घालण्याचा मनालीचा प्रवास सुरू झाला.

घर आणि शाळेतून तिच्या खेळाला पाठबळ मिळाले. मनालीनेही मेहनत सुरूकेली. राज्य पातळीवरील चमकदार कामगिरीने तिने देशपातळीवर मजल मारली. विशेष मुलांच्या स्पर्धेत राष्ट्रीय तिने एक सुवर्णपदक व एक कांस्यपदक मिळविले.

अशी मुलंच देशाचं नाव उंचवतील

 

अबुधाबीत जगाची मने जिंकली...
अबुधाबी येथे झालेल्या विशेष मुलांच्या आॅलिम्पिकमध्ये मनालीने पाऊल ठेवले आणि अवघ्या जगाची मने जिंकत तिने या आॅलिम्पिकमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक पटकाविले. त्याशिवाय स्काँट, डेडलिफ्ट व कम्बाइन्ड या प्रकारात तीन कांस्यपदके मिळवली. या स्पर्धेतील यशानंतर तिचा सर्वांना अभिमान वाटू लागला. अनेकजण आपल्या मुलांना घेऊन मनालीकडे येत असतात. तिच्यासारखं मुलांना बनविण्याचा संकल्प करतात.

माणूस शरीरानं कधीच
अपंग नसतो, तो मनानं अपंग असतो. मनात ताकत असेल कोणतेही यश अवघड नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनाली. सर्वसामान्य मुलांनी कधी निराशा आलीच तर मानलीला आठवावं. तिच्याप्रमाणे कोणताही खेळताही निवडून तिच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करावा.
- राजेंद्र चोरगे,
बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा.

 

Web Title: Manali's 'gold' performance in Special Children's Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.