साताºयाच्या महेश अन् अनिताने नॉयड्यात जिंकली भारतीयांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 09:38 PM2018-02-02T21:38:20+5:302018-02-02T21:38:25+5:30

सातारा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडामध्ये आयोजित राष्ट्रीय युवा फेस्टिव्हलमध्ये भारतातील सर्व राज्यांबरोबरच जम्मू कश्मीर, कारगील ते अंदमान,

 Mahesh and Anita of Saita won the hearts of Indians in India | साताºयाच्या महेश अन् अनिताने नॉयड्यात जिंकली भारतीयांची मने

साताºयाच्या महेश अन् अनिताने नॉयड्यात जिंकली भारतीयांची मने

Next

सातारा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडामध्ये आयोजित राष्ट्रीय युवा फेस्टिव्हलमध्ये भारतातील सर्व राज्यांबरोबरच जम्मू कश्मीर, कारगील ते अंदमान, हिमाचल प्रदेश या ठिकाणावरून आठ हजारांहून अधिक तरुण, तरुणींनी सहभाग घेतला होता. यामध्ये साताºयातील महेश सोनवणे अन् अनिता पाटील यांनी बाजीराव व दुर्गामाता यांचा पेहराव करून उपस्थितांची मने जिंकली.

भारत सरकार युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र संघटना यांच्या वतीने ग्रेटर नॉयडा उत्तरप्रदेश येथील गौतम बुद्ध विश्वविद्यालयात २२ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये साताºयाच्या महेश सोनावणे यांनी बाजीराव व अनिता पाटील यांनी दुर्गामातेच्या वेशभूषा परिधान केली. या दोघांनीही उपस्थित भारतीयांची मने जिकंली.

महेश सोनावणे आणि अनिता पाटील यांनी महाराष्ट्राच्या पथकाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उत्कृ ष्ट सादरीकरण केले. यामध्ये बाजीराव पेशवे व गणपती नृत्याचे भारतीयांनी कौतुक केले. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नेहरू युवा केंद्राचे महानिर्देशक मेजर जनरल दिलावर सिंह, संचालक सुनील मलिक, जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर तसेच विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नॉयडा, उत्तरप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात साताºयातील महेश सोनावणे व अनिता पाटील यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

Web Title:  Mahesh and Anita of Saita won the hearts of Indians in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.