महाराष्ट्रात महायुती ४२ जागा जिंकणार, नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास 

By नितीन काळेल | Published: March 29, 2024 07:11 PM2024-03-29T19:11:44+5:302024-03-29T19:14:40+5:30

सातारा : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती लोकसभेच्या ४२ जागा जिंकेल, ...

Mahayuti will win 42 seats in Maharashtra, Neelam Gorhe expressed confidence | महाराष्ट्रात महायुती ४२ जागा जिंकणार, नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास 

महाराष्ट्रात महायुती ४२ जागा जिंकणार, नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास 

सातारा : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती लोकसभेच्या ४२ जागा जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या शारदा जाधव उपस्थित होत्या.

उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा निवडणूक होत आहे. उमेदवार याद्याही जाहीर केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या आठ उमदेवारांची नावे जाहीर केली आहेत. राज्यात महायुती एकत्र आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय अजून जाहीर झालेला नाही. २०१९ च्या निवडणुकीपासून महिला मतदारांचा भाजप व त्यांच्या मित्रपक्षांकडे कल दिसून आलेला आहे. तसेच या महिला बचत गटांच्या माध्यमातूनही चांगले काम करु लागल्यात. गटासाठी घेतलेल्या ९९ टक्के कर्जाची परतफेड करण्यात येत आहे. त्यामुळे बॅंकाही महिला बचत गटांना कर्ज देण्यास उत्सूक आहेत. निवडणुकात महिला मतदारांचा आणखी टक्का वाढण्याची गरज आहे.

वेळ पडल्यावर बॅंकांवरही कारवाई

नियमीत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा प्रश्न उपसभापती गोऱ्हे यांना करण्यात आला. यावर त्यांनी कर्जमाफीची यादी मागवून घेते. किती शेतकरी राहिले आहेत याची माहिती घेऊन १५ दिवसांत याबद्दल काय तो निर्णय घेण्यात येईल. वेळ पडल्यावर बॅंकांवरही कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mahayuti will win 42 seats in Maharashtra, Neelam Gorhe expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.