किसनवीर खंडाळाच्या मळणी यंत्राला आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:28 PM2019-03-01T12:28:32+5:302019-03-01T12:30:03+5:30

खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर याठिकाणी किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ऊसतोडणी मळणी यंत्राला (हॉर्वेस्टर) अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऊसतोडणी मळणी यंत्राला आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली, अशी चर्चा घटनास्थळी होते. ही घटना बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.२० च्या दरम्यान घडली आहे.

Kisanvir Khandala's threshing instrument fire! | किसनवीर खंडाळाच्या मळणी यंत्राला आग!

किसनवीर खंडाळाच्या मळणी यंत्राला आग!

Next
ठळक मुद्देकिसनवीर खंडाळाच्या मळणी यंत्राला आग! अग्निशमन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर याठिकाणी किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ऊसतोडणी मळणी यंत्राला (हॉर्वेस्टर) अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऊसतोडणी मळणी यंत्राला आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली, अशी चर्चा घटनास्थळी होते. ही घटना बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.२० च्या दरम्यान घडली आहे.

किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी मळणी यंत्र ऊसतोडीकरिता गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजीनगर परिसरात वास्तव्याला आहे. दरम्यान, ऊसतोडणी यंत्र शिवाजीनगर याठिकाणी एका रस्त्यालगत लावत चालक हा गेला असता काही वेळांनंतर ऊसतोडणी यंत्राला आग लागल्याचे तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले.

ही आग एवढी भीषण होती की ऊसतोडणी यंत्र हा काहीवेळातच जळून खाक झाला. तत्पूर्वी आग इतरत्र परिसरात पसरू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून शिरवळ येथील अग्निशमन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात खंडाळा पोलीस व खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. याबाबतची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

 

Web Title: Kisanvir Khandala's threshing instrument fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.