भारतातील सर्वात उंच , आकर्षक वजराई धबधब्यास मान्यता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:36 AM2019-06-28T00:36:53+5:302019-06-28T00:37:41+5:30

देशातील सर्वात उंच व आकर्षक धबधबा म्हणून सातारा तालुक्यातील भांबवली येथील वजराई धबधब्याला स्थान मिळाले आहे. वन विभागाच्या माध्यमातून भांबवली वजराई धबधबा या पर्यटनस्थळाचा कायापालट केला जात

India's tallest, lucrative jewelery appraisal ... | भारतातील सर्वात उंच , आकर्षक वजराई धबधब्यास मान्यता...

भारतातील सर्वात उंच , आकर्षक वजराई धबधब्यास मान्यता...

googlenewsNext
ठळक मुद्देबुटाची प्रतिकृती उभारणार धबधबा पाहण्यास लहान मुलांसाठी विशेष आकर्षण म्हणून पावसानंतर मुंबईतील वाळकेश्वर येथे असलेल्या ‘म्हातारीचा बूट’ची प्रतिकृती भांबवली येथे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रतिकृतीतून सह्याद्री पर्वतरांगांमधील निसर्गसौंदर्याचा आनंद ल

बामणोली : देशातील सर्वात उंच व आकर्षक धबधबा म्हणून सातारा तालुक्यातील भांबवली येथील वजराई धबधब्याला स्थान मिळाले आहे. वन विभागाच्या माध्यमातून भांबवली वजराई धबधबा या पर्यटनस्थळाचा कायापालट केला जात आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच संयुक्त वन व्यवस्थापन समिती भांबवली व वन विभागाच्या सहकार्याने प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे यंदापासून पर्यटकांना सशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती वन समिती व वन खात्याकडून देण्यात आली आहे.

सातारा तालुक्यातील कास पुष्प पठार, ठोसेघर धबधबा, बामणोली परिसरातील शिवसागर तलाव आदी पर्यटनस्थळे पाहण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर भांबवली येथील वजराई धबधबा हेही प्रेक्षणीयस्थळ आहे. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी सोयी-सुविधा नसल्यामुळे हा परिसर दुलर्क्षित होता. हा धबधबा घनदाट जंगलाने व्यापलेला असून, धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्द झाडेझुडपे व घसरड्या पायवाटेने धबधब्यापर्यंत पोहोचावे लागते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनास जाण्यास अनेकजण उत्सुक नसतात.

भांबवली धबधब्याची उंची तब्बल १८४० फूट असून, नैसर्गिक विविधतेने नटलेल्या देशातला एक नंबरचा धबधबा व जगातले मोठे पुष्प पठार असल्याने आधुनिक पर्यटनस्थळ विकसित करण्याचा मानस वन विभाग, महाराष्ट्र शासनाचा आहे. त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर उंच कड्यावरून तीन टप्प्यांत कोसळणाऱ्या या धबधब्याची अखेर शासनाने दखल घेतली व ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या धबधब्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्यामुळे पर्यटन सोयीसुविधांचे काम सुरू आहे.
भांबवली धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलव्याप्त व घसरड्या उताराच्या ठिकाणी पायºया व रेलिंगचे काम झाले आहे. यंदाच्या पर्यटनाच्या हंगामात या ठिकाणी स्वच्छतागृह, तिकीट केबीन, माहितीदर्शक फलक, सूचना फलक बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना सोयी सुविधा टप्प्याटप्प्याने पुरविल्या जात आहेत.




भांबवली येथील वजराई धबधबा विकसित करण्यासाठी लागणारे पूर्ण पाठबळ पुरविणार तसेच राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, सातारा विधानसभा


पर्यटकांना डोंगरातून सुरक्षित उतरण्यासाठी पायºया व रेलिंगच्या सुविधा पुरविल्या आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन खात्याच्या सहकार्याने पर्यटकांना सर्वतोपरी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे, तरी पर्यटकांनी निसर्गाचा आस्वाद घ्यावा.
- रवींद्र मोरे,पर्यटनप्रमुख
सह्याद्री पठार विकास संघ


भांबवली येथील वजराई धबधबा तीन टप्प्यात खळखळून वाहत आहे

Web Title: India's tallest, lucrative jewelery appraisal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.