वेळ आली तर दिल्लीत जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:58 PM2017-09-19T23:58:40+5:302017-09-19T23:58:40+5:30

If time comes, go to Delhi | वेळ आली तर दिल्लीत जाऊ

वेळ आली तर दिल्लीत जाऊ

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : ‘कोणी पेन्शन मिळवून देता का रे पेन्शन?, अशी आर्त साद घालणाºया, वार्धक्याकडे झुकलेल्या माजी सैनिकाच्या मदतीला उंब्रज येथील आर्मी हाऊस धावून गेले आहे. सेवानिवृत्त कॅप्टन अ‍ॅड. इंद्रजित जाधव उंब्रज व परिसरातील आजी-माजी सैनिकांच्या संघटनेच्या सहकार्याने माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी पुढे आले आहेत. वेळ आली तर दिल्लीत जाऊन पाठपुरावा करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
देशसेवेत अग्रेसर असणाºया सातारा जिल्ह्यातील एका माजी सैनिकाची परिस्थिती ‘लोकमत’मध्ये मांडल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले. ‘हक्काच्या पेन्शनसाठी ५० वर्षे सैनिकाचा लढा’ ही बातमी उंब्रज व परिसरात चांगलीच चर्चेत राहिली. या माजी सैनिकाची व्यथा जगापुढे आली. उंब्रज येथील सेवानिवृत्त कॅप्टन अँड. इंद्र्रजित जाधव यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला आणि माजी सैनिक हणमंतराव पाटील यांची माहिती घेतली. पाटील यांच्याबरोबर संपर्क करून जाधव यांनी त्यांच्या जवळ असलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रतींचा एक संच स्वत: जवळ घेतला आहे.
माजी सैनिक पाटील यांच्या जवळची सर्व कागदपत्रे जाधव यांनी तपासली आहेत. ही सर्व कागदपत्रे त्यांनी क्रमवारीत जोडली आहेत आणि व्यक्तिगत लक्ष घालून ते पाटील यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. वेळप्रसंगी स्वखर्चाने दिल्लीला जावे लागले तरी जाण्याची तयारी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दर्शविली.

Web Title: If time comes, go to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.