भाजपला रोखण्यासाठी आघाडी धर्म पाळा : पृथ्वीराज चव्हाण --काँगे्रसचा मुडदा पाडून आघाडी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:59 PM2019-03-12T23:59:02+5:302019-03-13T00:01:26+5:30

‘राष्ट्रवादी काँगे्रसने मलासुद्धा सोडलेले नाही. गतवेळी त्यांनीच माझे सरकार पाडले. मला माजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरावे लागले. तरीही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला

Follow the lead religion to prevent BJP: Prithviraj Chavan - Do not lead a Congress by defeating Congress | भाजपला रोखण्यासाठी आघाडी धर्म पाळा : पृथ्वीराज चव्हाण --काँगे्रसचा मुडदा पाडून आघाडी नको

कºहाड येथे सातारा जिल्हा काँगे्रस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धैर्यशील कदम, आमदार जयकुमार गोरे, शिवराज मोरे, आमदार आनंदराव पाटील, हिंदुराव पाटील आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकºहाडात कार्यकर्त्यांचा मेळावा

कºहाड : ‘राष्ट्रवादी काँगे्रसने मलासुद्धा सोडलेले नाही. गतवेळी त्यांनीच माझे सरकार पाडले. मला माजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरावे लागले. तरीही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला रोखण्यासाठी त्यांना बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या त्यांनी आपल्या मदतीची जाण ठेवो न ठेवो आपण मात्र आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळायचा आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कºहाड येथे मंगळवारी सातारा जिल्ह्णातील काँगे्रस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, धैर्यशील कदम, हिंदुराव पाटील, शिवराज मोरे, डॉ. इंद्रजित मोहिते, मनोहर शिंदे, भीमराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी आजच माझी भेट घेतली. त्यांनी मदतीचा हात मागितला. त्यावेळी मी त्यांना अगोदर तुम्ही प्रमुख काँगे्रस कार्यकर्त्यांना भेटा. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात जे मळब आहे. ते दूर करा, अशी सुचना केली. त्यानंतर आम्ही मदत करणारच आहोत.’

जयकुमार गोरे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्णाच्या राजकारणात राष्ट्रवादीला सगळे चालते; पण काँगे्रसचा कार्यकर्ता चालत नाही. डीपीडीसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची युती भाजप-सेनेशी होते; पण काँगे्रसशी होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळायचा असेल तर अगोदर या आघाडीत काँगे्रस कार्यकर्त्याचं स्थान काय असणार? हे समजले पाहिजे. जातिवाद्यांना रोखण्यासाठी आघाडी गरजेची आहे; पण काँगे्रसचा मुडदा पाडून आघाडी होणार असेल तर त्या आघाडीचा काय उपयोग?’ असा सवाल त्यांनी केला.
आनंदराव पाटील म्हणाले, ‘काँगे्रस कार्यकर्त्यांतील आपापसातील मतभेद दूर झाल्यावर आपण काय करू शकतो, याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. त्यामुळे यापुढेही आपण मतभेद बाजूला सारून कामाला लागले पाहिजे.’

रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘जिल्ह्णाच्या राजकारणात आपली दखल घ्यावी लागेल, एवढी काँगे्रसची ताकद आहे. राष्ट्रवादीच्या मागून काँगे्रस फरफटत येणार नाही. आता आपला शत्रू बदलला असून, तो भाजप झाला आहे. त्यासाठी आघाडी धर्म जरूर पाळू; पण विधानसभेला जिल्ह्णात चार जागा काँगे्रसला मिळाल्या
पाहिजेत.’मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. झाकीर पठाण यांनी आभार मानले.

अगोदर राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाऊ द्या
खासदार उदयनराजेंची उमेदवारी सातारा मतदारसंघातून जाहीर झाली असली तरी त्यांच्यातील धुसफूस अजून थांबलेली नाही. अगोदर सगळी राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाऊ द्या, मग आपण त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेऊ. आता उगाच घाई करायला नको, असे मत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी या बैठकीत व्यक्त केले.

काँगे्रसच्या सहा तालुक्यांच्या कार्यकारिणी बरखास्त...
सातारा जिल्ह्णातील कोरेगाव, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर, सातारा या सहा तालुक्यांतील काँगे्रस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी लवकरच कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन नवीन कार्यकारिणीचे गठण करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रणजित नाईक-निंबाळकर यांनी आपल्या भाषणात दिली.
 

बाबा आमच्या पाठीवरील वळ बघा
राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय काँगे्रसच्या कार्यकर्त्यांवर नेहमीच घाव घातला आहे. ग्रामपंचायतीपासून आमदारकीपर्यंत ते कधीच कोणाला सोडत नाहीत. तेव्हा आमच्या पाठीवर उठलेले वळ जरा तुम्ही बघा आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या हाताला लकवा भरला आहे, अशी भाषा वापरणाऱ्यांबरोबर कसे वागायचे? याचा विचार तुम्हीच करा, असे मत धैर्यशील कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
 

लगीन ठरवा; पण याद्या करून
राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विश्वास ठेवण्याची परिस्थिती सध्यस्थितीत राहिलेली नाही. तुम्ही दोन्ही पक्षांच्या आघाडीचं लगीन जरूर ठरवा; पण त्याच्या याद्या करून घेऊनच. मानपान दोघांना समान राहील, असा याद्यात उल्लेख करा, असे मत अजितराव पाटील-चिखलीकर यांनी व्यक्त करताच उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.


 

Web Title: Follow the lead religion to prevent BJP: Prithviraj Chavan - Do not lead a Congress by defeating Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.