‘दारू नाही, दूध प्या’ उपक्रम -जकातवाडीतील युवकांचा व्यसनमुक्तीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:29 PM2019-01-01T23:29:05+5:302019-01-01T23:31:08+5:30

सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे ग्रामपंचायत व योगेश शिंदे मित्र समूहाच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी ‘दारू नाही दूध प्या’ हा उपक्रम राबविण्यात आला.

 'Do not drink alcohol, drink milk' Undertakings- The determination of de-addiction of young people in the market | ‘दारू नाही, दूध प्या’ उपक्रम -जकातवाडीतील युवकांचा व्यसनमुक्तीचा निर्धार

‘दारू नाही, दूध प्या’ उपक्रम -जकातवाडीतील युवकांचा व्यसनमुक्तीचा निर्धार

Next
ठळक मुद्देव्यसनापासून दूर राहण्याची घेतली थपथशंभरहून अधिक युवकांचा सहभाग

सागर नावडकर ।
शेंद्रे : सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे ग्रामपंचायत व योगेश शिंदे मित्र समूहाच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी ‘दारू नाही दूध प्या’ हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील शंभरहून अधिक युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी सरपंच चंद्रकांत सणस म्हणाले, ‘व्यसनाधीनतेमुळे नवीन पिढी बरबाद होत आहे. युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावात साताऱ्यातील परिवर्तन संस्थेच्या वतीने मानसमित्र व्यसनमुक्ती केंद्र्रही सुरू केले आहे. यावेळी राजेश भोसले यांनी व्यसनाधीनतेमुळे आयुष्यावर होणाºया सामाजिक, आर्थिक परिणामांची माहिती युवकांना दिली. तसेच युवकांना व्यसनापासून दूर राहण्याची शपथ दिली. नववर्षाची सुरुवात व्यसनमुक्तीने करूया, असा संकल्प केला.

यावेळी सरपंच चंद्र्रकांत सणस, योगेश शिंदे, उत्तम भोसले, धनराज दौंडे, तानाजी जाधव, महेश संकपाळ, राजू जावळे, अमोल कांबळे, समीर जाधव, मयूर पडवळ, अनिल ठोंबरे, अक्षय शिंदे, सतीश पवार, संजय जगताप, गोविंद देशमुख, पांडुरंग माने, अभिजित चव्हाण, दीपक देशमुख, नारायण दळवी, अक्षय सणस, मंगेश शिंदे, ओंकार सणस, सकटे यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जकातवाडी (ता. सातारा) येथे ३१ डिसेंबर रोजी ‘दारू नाही, दूध प्या’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत सणस, योगेश शिंदे यांच्यासह युवक उपस्थित होते.

Web Title:  'Do not drink alcohol, drink milk' Undertakings- The determination of de-addiction of young people in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.