स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून जागा ताब्यात, वनविभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 02:33 PM2019-05-02T14:33:02+5:302019-05-02T14:34:11+5:30

वनक्षेत्रात अतिक्रमण करून त्यावर स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यावर वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमित जागेतील स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून अर्धा एकर जागा वनविभागाने ताब्यात घेतली. सायघर, ता. जावळी येथे ही कारवाई केली.

Destruction of strawberry crop, forest clearance, forest department action | स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून जागा ताब्यात, वनविभागाची कारवाई

स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून जागा ताब्यात, वनविभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देस्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून जागा ताब्यात, वनविभागाची कारवाई सायघर येथील अर्धा एकर जागा पुन्हा ताब्यात

सातारा : वनक्षेत्रात अतिक्रमण करून त्यावर स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यावर वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमित जागेतील स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून अर्धा एकर जागा वनविभागाने ताब्यात घेतली. सायघर, ता. जावळी येथे ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी, सायघर, ता. जावळी येथील ग्यानदेव कोंडिबा धनावडे यांनी अर्धा एकर वनक्षेत्रात शेतीसाठी अतिक्रमण केले होते. याविषयीची माहिती मिळाल्यानंतर ग्यानदेव धनावडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती या जागेवर अतिक्रमण केल्याचे आणि अतिक्रमित क्षेत्रात संशयिताने स्ट्रॉबेरीचे पीक लावल्याचे सांगितले. हे पीक वनविभागाच्या वतीने नष्ट करण्यात आले असून, हे क्षेत्र पुन्हा वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत मेढ्याचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. जी. सय्यद, मेढ्याचे वनपाल श्रीरंग शिंदे, वनरक्षक रामचंद्र पारधाने, रझिया शेख, संगीता शेळके, विजय फरांदे यांनी अतिक्रमण मोहीम पार पाडली.

Web Title: Destruction of strawberry crop, forest clearance, forest department action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.