Lok Sabha Election 2019 आघाडी-युतीत ‘काटे की टक्कर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:15 PM2019-04-18T23:15:31+5:302019-04-18T23:15:47+5:30

कºहाड : कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँगे्रसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गत चार वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे ...

A collision collapse in the alliance! | Lok Sabha Election 2019 आघाडी-युतीत ‘काटे की टक्कर’!

Lok Sabha Election 2019 आघाडी-युतीत ‘काटे की टक्कर’!

googlenewsNext

कºहाड : कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँगे्रसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गत चार वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे झाल्याने येथे भाजपनेही बरेच पाय पसरलेत ! त्यातच विद्यमान खासदारांविषयी असणारी नाराजी अन् युतीचा कºहाडशी नाळ असणारा उमेदवार यामुळे या मतदार संघात ‘काटें की टक्कर’ पाहायला मिळेल, असेच सध्या चित्र आहे.
या मतदार संघात काँगे्रस अंतर्गत दोन मोठे गट आहेत. पैकी एक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा तर दुसरा माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचा होय. तर पृथ्वीबाबांबरोबर असणाऱ्या डॉ. अतुल भोसलेंनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे. त्यामुळे या मतदार संघात त्रांगडं निर्माण झाले आहे.
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रसचे आमदार पृथ्वीबाबा आघाडी धर्म तर डॉ. अतुल भोसले युती धर्म पाळत आहेत. मात्र, विलासराव पाटील-उंडाळकर यांची भूमिका अस्पष्ट आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसच आपला शत्रू नंबर एक आहे. असा सूर सुरुवातीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथे आळविला. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक प्रश्नांपेक्षा आज देशासमोरचे प्रश्न मोठे असल्याची जाणीव करून दिल्याने काँगे्रस कार्यकर्त्यांचा नाईलाज झाला आहे.
भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या नरेंद्र पाटलांना शिवसेनेकडून उमेदवारी घ्यावी लागली आहे. त्यामुळे शिवसैनिकांपेक्षा भाजप कार्यकर्तेच सध्या प्रचारात जास्त दिसत आहेत. नरेंद्र पाटलांची कºहाडशी असणारी नाळ त्यांच्या फायद्याची ठरत आहे. तर उदयनराजे भोसलेंनीही त्यांचे समर्थक राजेंद्र यादव यांच्यासह दोन्ही काँग्रे्रसला बरोबर घेत प्रचारावर जोर दिला आहे.
या मतदार संघात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचा सक्षम गट आहे. या गटाची भूमिका सध्या गुलदस्त्यातच आहे. सध्या पंचायत समितीच्या सभापती या गटाच्याच आहेत. याशिवाय खरेदी विक्री संघ, बाजार समिती, कोयना दूध संघ आदी संस्था या गटाच्या ताब्यातच आहेत. सध्या या गटाची धुरा युवा नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील सांभाळत असून, त्यांनी उघड भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, त्यांचा कल नरेंद्र पाटील यांना मदतीचा राहील, असे मानले जाते.
मागच्या निवडणुकीत़
२०१४ मधील विधानसभेला काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना ७६, ८३१ मते मिळाली होती. अपक्ष विलासराव पाटील यांना ६०,४१३, तर भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांना ५८,६२१ मते मिळाली होती.

युती । प्लस पॉर्इंट काय आहेत?
भाजपने शेखर चरेगावकर व अतुल भोसले यांंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पावसकर कºहाडचेच, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या भाजपच्याच. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.
युती । विक पॉर्इंट काय आहेत?
एकेकाळी कºहाड शहरात शिवसेनेची ताकद चांगली होती. सेनेला मानणारे नगरसेवकही पालिकेत होते. मात्र, सध्या सेनेची ती ताकद उरलेली नाही. सर्व शिवसैनिक व रिपाइंचे कार्यकर्ते अजून प्रचारात सक्रिय दिसत नाहीत.
आघाडी । विक पॉर्इंट काय आहेत?
या मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रभाव तुलनेने कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी या मतदार संघात बहुतांशी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरच अवलंबून आहे. तरीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसतात.
आघाडी । प्लस पॉर्इंट काय आहेत?
कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रीय काँगे्रसचे आमदार प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्याकडून आघाडी धर्माचे पालन होत आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रचाराचा फायदा होऊ शकतो.

Web Title: A collision collapse in the alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.