परळी वन परिमंडळ कार्यालयात स्फोट; भिंतीला तडे; पत्राही उडाला, पहाटेची घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 09:55 AM2024-03-14T09:55:05+5:302024-03-14T09:59:49+5:30

घटनास्थळी वन परिमंडळ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून नेमका कशाचा स्फोट झाला आहे याची माहिती घेत आहेत.

Blast in Parli Forest Circle Office; cracks in the wall an early morning incident | परळी वन परिमंडळ कार्यालयात स्फोट; भिंतीला तडे; पत्राही उडाला, पहाटेची घटना

परळी वन परिमंडळ कार्यालयात स्फोट; भिंतीला तडे; पत्राही उडाला, पहाटेची घटना

सातारा : परळी येथील वन परिमंडळ कार्यालयामध्ये गुरुवार दि. १४ मार्च रोजी पहाटे पाच वाजता मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कार्यालयातील पत्रा ,दारे खिडक्या खिडक्या उडून काही अंतरावर पडल्या. घटनास्थळी वन परिमंडळ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून नेमका कशाचा स्फोट झाला आहे याची माहिती घेत आहेत.

गुरुवारी पहाटे परळी येथील वन परिमंडल कार्यालयाच्या ऑफिस स्टोअर रूम मध्ये जोराने आवाज आला. या आवाजाने परिसरातील रहिवासी यांनी वनपरमंडल कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी या कार्यालयामध्ये कोणीच उपस्थित नव्हते. या घटनेची कल्पना फोनवरून परळीचे वन परिमंडल अधिकारी यांना देण्यात आली.
या स्फोटाचा आवाज एवढा जोरात होता की परिसरात सगळे जागे झाले. तसेच स्टोअर रूम ऑफिस मधील खिडक्या दारे उडून लांब पडली आहेत. पत्रा तुटला आहे
या स्टोअर मध्ये दोन दुचाकी, आग विझवण्याच्या मशीन  तसेच कागदपत्रे होती.

आज पहाटे झालेला स्फोट हा जिलेटिन बॉम्बसदृश्य वस्तूचा असावा अशी चर्चा परिसरातील नागरिकांकडून होत आहे अशा वस्तू या कार्यालयात कशा साठी ठेवल्या ? जप्ती चा माल असेल तर तो संबंधित कार्यालयातच पंचनामा करून ठेवावा लागतो. अशी चर्चा लोकांमध्ये आहे.

Web Title: Blast in Parli Forest Circle Office; cracks in the wall an early morning incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.