साताऱ्यात दोन वर्षीय मुलीवर अत्याचार, सतरा वर्षाचा युवक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:54 AM2019-05-03T11:54:43+5:302019-05-03T11:55:25+5:30

सातारा शहर परिसरातील एका उपगनरामध्ये दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Atrocities against two-year-old girl in Satara, 17 year old youth | साताऱ्यात दोन वर्षीय मुलीवर अत्याचार, सतरा वर्षाचा युवक ताब्यात

साताऱ्यात दोन वर्षीय मुलीवर अत्याचार, सतरा वर्षाचा युवक ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यात दोन वर्षीय मुलीवर अत्याचार, सतरा वर्षाचा युवक ताब्यातगळफास घेऊन एकाची आत्महत्या

सातारा : शहर परिसरातील एका उपगनरामध्ये दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित मुलीला तिच्या मावशीने एका ढाब्यावर नेले होते. तेथे मावशीचे काम सुरू असताना मुलगी खेळत होती. काम संपल्यानंतर ती मावशीसोबत घरी आली. यावेळी मुलीची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे तिच्या नात्यातील दोन महिलांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संबंधित पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेऊन संशयिताचा शोध घेण्यास सुरूवात केली. एका सतरा वर्षीय युवकाने या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना समजली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले. तोही अल्पवयीन असल्यामुळे त्याला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे.

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

 कण्हेर,ता. सातारा येथील संतोष भानुदास वाघमळे (वय ४२) यांनी गुरुवारी दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष वाघमळे हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. त्यांना दारूचे व्यसनही होते. त्यांची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी राहत आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी त्यांनी कण्हेरपासून जवळच असलेल्या एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती त्यांचा चुलत भाऊ सागर वाघमळे याला मिळाली. त्यानंतर त्याने सातारा तालुका पोलिसांना याची माहिती दिली. संतोष वाघमळे यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही.

Web Title: Atrocities against two-year-old girl in Satara, 17 year old youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.