साताऱ्यात वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 03:45 PM2019-04-30T15:45:31+5:302019-04-30T15:52:31+5:30

नात्याला काळीमा फासणारी घटना साताऱ्यात घडली असून वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेर वडिलांच्या गैरकृत्याला कंटाळून मुलीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Atrocities against the daughter of her daughter in Satara | साताऱ्यात वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

साताऱ्यात वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यात वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचारवडाप जीपचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा : नात्याला काळीमा फासणारी घटना साताऱ्यात घडली असून वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेर वडिलांच्या गैरकृत्याला कंटाळून मुलीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी साडेचौदा वर्षाची आहे तर तिचा वडील ३६ वर्षाचा आहे. संबंधित कुटुंबामध्ये मुलीची आई असून ती धुणी-भांडीचे काम करते. मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दि. १८ ते २७ एप्रिलपर्यंत वारंवार मुलीसोबत वडिलाने गैरकृत केले.

मुलगी घरात एकटी असताना वडील मुलीशी घृणास्पद प्रकार करत होता. या घटनेनंतर मुलगी घाबरुन जायची. या कृत्याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची वडील धमकी देत होते. अखेर घडलेल्या घटनेबाबत मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला सोबत घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले.

पीडित मुलीने पोलिसांना घटना सांगितल्यांतर पोलीसही हादरुन गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ संशयित पित्याविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.त्यानंतर पित्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फौजदार नानासाहेब कदम हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


वडाप जीपचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

 वडाप जीपचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजता दौलतनगर (करंजे सातारा) येथे घडली. पंकज नारायण इंगुळकर (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या वडाप जीपचालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पंकज इंगुळकर हे सातारा ते नागठाणे असे स्वत:च्या जीपमधून वडाप करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते.

रविवारी रात्री घरी दौलतनगर येथील घरी आल्यानंतर त्यांनी घरातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इंगुळकर यांना सिव्हिलमध्ये आणले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले असता ते मृत असल्याचे त्यांनी घोषीत केले. इंगुळकर यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नसून पोलीस घरातल्यांकडे चौकशी करत आहेत.

Web Title: Atrocities against the daughter of her daughter in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.