मेढ्यात ४३ जातींची रोपे आपल्या दारी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:43 PM2019-07-19T23:43:23+5:302019-07-19T23:43:27+5:30

मेढा : आपण राहत असलेल्या परिसरात झाडे लावावीत, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडूनही तयारी केली जाते; पण ...

43 species of seedlings in your arid valley ...! | मेढ्यात ४३ जातींची रोपे आपल्या दारी...!

मेढ्यात ४३ जातींची रोपे आपल्या दारी...!

Next

मेढा : आपण राहत असलेल्या परिसरात झाडे लावावीत, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडूनही तयारी केली जाते; पण रोपे आणण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्या नर्सरीपर्यंत जाऊ शकत नाही. याची जाणीव ठेवून सामाजिक वनीकरण विभागाने मेढा येथे ‘रोपे आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम ठेवला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शासनाच्या ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सर्वत्र झाडे लावली जात आहेत. सामाजिक वनीकरण विभागानेही त्यांच्या रोपवाटिकेत मोठ्या संख्येने रोपे तयार केली आहेत. सर्वसाधारणपण जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला असतो. आताच रोपे लावली तर जगण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या काळात रोपांना मागणी जास्त असते अन् या विभागाकडूनही सवलतीच्या दरात रोपे दिली जातात.
आपला कामधंदा सोडून प्रत्येकजण सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत जाऊ शकत नाही, त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही वेळ मिळाला नाही म्हणून रोपे लावण्याचे राहून जाते, असे होऊ नये म्हणून मेढा येथील चौकात एक स्टॉल ठेवला आहे.
या ठिकाणी बांबू, साग, शेवगा, काजू, जांभूळ आदी विविध प्रकारच्या ४३ जातींची रोपे ठेवली आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना चांगली सोय झाली आहे. येथून रोपे घेऊन जात आहेत.
या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांना झाडे कशी लावायची? सर्वसाधारण किती मोठा खड्डा असावा? खते कशी घालायची? याबाबत वनकर्मचारी शास्त्रशुद्ध माहिती देत असतात. वृक्ष लागवडीसोबतच लोकांना वृक्ष संवर्धनाविषयीही मार्गदर्शन केले जात आहे.
वृक्षारोपणाविषयी जनतेतून जागृती व्हावी, यासाठी मेढा येथे सामाजिक वनीकरणकडून शनिवार, दि. २० रोजी वृक्षदिंडीही काढण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडीविषयी मार्गदर्शन
या स्टॉलवर आपल्या परिसरात उगवतील असेच रोपे आहेत. मात्र अनेकांना कोणती घ्यावीत, याचा अंदाज येत नाही. अशावेळी झाड कोठे लावणार आहात? दारात, शेतात याची माहिती घेतली जाते. त्यानुसार त्यांना पर्याय सूचविले जातात, अशी माहिती मेढा येथील सामाजिक वनिकरणचे वनक्षेत्रपाल महांतेश बगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: 43 species of seedlings in your arid valley ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.