महाड-पंढरपूर मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 10:14 AM2018-09-15T10:14:33+5:302018-09-15T10:21:55+5:30

व्यायाम करण्यासाठी निघालेल्या तीन तरुणांना एका वाहनाने उडवल्याने भीषण अपघात झाला आहे.

3 killed in accident near vidani phaltan | महाड-पंढरपूर मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

महाड-पंढरपूर मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

फलटण (सातारा) : व्यायाम करण्यासाठी निघालेल्या तीन तरुणांना एका वाहनाने उडवल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. महाड-पंढरपूर राज्य मार्गावर फलटण तालुक्यातील विडणी हद्दीत शनिवारी (15 सप्टेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. 

अक्षय रामचंद्र नाळे (23), राहुल रविंद्र नाळे (23) व अमित बबन नाळे (22) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरद येथे जिमला जाण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता हे तिघेजण घरातून बाहेर पडले होते. महाड-पंढरपूर राज्य मार्गावर हे तरुण दुचाकीवरून (एमएच 12 जीसी 6754) आले असता त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातानंतर संबंधित वाहनधारक फरार झाला. एवढेच नाही तर त्या वाहनधारकाने त्या तरुणांचे मृतदेह रस्त्याच्या बाजूला ठेवून दिले. ग्रामस्थांमधून संबंधित वाहनधारकाला अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


 

Web Title: 3 killed in accident near vidani phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.