एक किलो सोने घेऊन पत्नीचा पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:52 PM2019-04-26T23:52:52+5:302019-04-26T23:52:58+5:30

इस्लामपूर : शहराच्या संभाजी चौकातील खराडे गल्लीत असणाऱ्या घरातून महिलेने आई, मामा व इतर नातेवाईकांच्या साथीने पतीच्या घरातून ३३ ...

Wife's wife, taking one kg of gold | एक किलो सोने घेऊन पत्नीचा पोबारा

एक किलो सोने घेऊन पत्नीचा पोबारा

googlenewsNext

इस्लामपूर : शहराच्या संभाजी चौकातील खराडे गल्लीत असणाऱ्या घरातून महिलेने आई, मामा व इतर नातेवाईकांच्या साथीने पतीच्या घरातून ३३ लाख रुपयांच्या १ किलो १00 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीची ही घटना १८ नोव्हेंबर २0१८ रोजी घडली, मात्र त्याबाबत शुक्रवारी पतीच्या वागण्यावर संशय घेऊन पत्नीने हे चौर्यकर्म करत पोबारा केला आहे.
याबाबत पती जितेंद्र ज्ञानदेव परदेशी (वय ५१, रा. संभाजी चौक) यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली. मुलींच्या शिक्षणावर आणि जगण्यावर परिणाम व्हायला नको, या भीतीने त्यांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र समजूतदारपणे सांगूनही चोरी केलेले सोने परत मिळणार नसल्याची खात्री झाल्याने, अखेर परदेशी यांनी पोलिसांत धाव घेतली.
जितेंद्र परदेशी यांची पत्नी पूजा जितेंद्र परदेशी (रा. तळेगाव दाभाडे, पुणे), तिचा मामा गणेश शंकर भोई (वाळवा), रुक्मिणी परदेशी, कल्पना रवींद्र परदेशी, दीपक वासुदेव भोई, महेश हरिश्चंद्र परदेशी, मंगल हरिश्चंद्र परदेशी (सर्व रा. तळेगाव, दाभाडे, पुणे), देवेंद्र वासुदेव भोई (रा. भोई गल्ली वाळवा) अशा आठ जणांविरुध्द पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.
जितेंद्र व पूजा यांचा २१ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी फिलिपाईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. जितेंद्र यांचे बिअर शॉपी, मंगल कार्यालय, व्हिडीओ गेम पार्लर आणि शेती असे व्यवसाय आहेत. या सर्व व्यवसापासून मिळणाºया उत्पन्नातून त्यांनी १ किलो १00 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करून घरी ठेवले होते. गेल्या चार वर्षांपासून पत्नी पूजा ही जितेंद्र यांच्यावर बाहेरख्यालीपणाचा आरोप करून वाद घालत होती. अनेकवेळा समजूत काढूनदेखील पूजाच्या वागण्यात बदल झाला नाही. नोव्हेंबर १७ मध्ये हा वाद मिटविण्यासाठी पत्नीचे नातेवाईक घरी आले होते. त्यावेळी धंद्यातील गुंतवणूक आणि फ्लॅट घेण्यासाठी घरामध्ये ठेवलेली ९ लाख ६८ हजार रुपयांची रोकड गायब झाली होती. चौकशी करून पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर मेहुणी गायत्री परदेशी हिने तिच्या पिशवीत ठेवलेली रक्कम काढून दिली होती.
यादरम्यान पत्नी पूजा ही जितेंद्र यांच्या घरामध्येच विभक्त राहत होती. त्यावेळीही तिचा वाद सुरूच होता. १८ नोव्हेंबर २0१८ रोजी वरील सर्व संशयित भांडण मिटविण्यासाठी घरी आले. यावेळी मामा गणेश भोई याने भांडण मिटविण्याऐवजी अपशब्द वापरून वाद वाढवत ठेवला. हे भांडण वाढू नये यासाठी जितेंद्र परदेशी काही काळ घराबाहेर पडले. या संधीचा फायदा घेत पत्नी पूजाने मामाच्या सोबतीने घरातील बेडरुममधील स्वत:चे कपडे बॅगमध्ये भरतानाच सोन्याच्या दागिन्यांचा डबाही चोरला. ही घटना मुलींनी पाहिली होती. त्यानंतर जितेंद्र यांनी समजूतदारपणे चोरलेले दागिने परत देतील, या विचाराने फिर्याद दिली नव्हती. मात्र पूजाच्या मामाने जितेंद्र यांना मारहाण करून, ‘तुझे सोने आम्ही विकले आहे. तुला काय करायचे ते कर. तसेच गुंडांना सुपारी देऊन तुझी गेम करू’, अशी धमकी दिली. त्यामुळे जितेंद्र परदेशी यांनी फिर्याद दिली.

चोरीस गेलेला मुद्देमाल असा...
चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांत मंगळसूत्र, मिनी टॉप्स, ५ तोळे वजनाची ५ बिस्किटे, पेंडंट, तोडे, बांगड्या, पाटल्या, पानवेल, अंगठ्या, राणीहार अशा एकूण १ किलो १00 ग्रॅम दागिन्यांचा समावेश आहे.

Web Title: Wife's wife, taking one kg of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.