तासगावमध्ये पाणीपट्टीत वाढ

By admin | Published: February 13, 2015 10:31 PM2015-02-13T22:31:00+5:302015-02-13T22:58:49+5:30

१ एप्रिलपासून अंमलबजावणी : बाराशेऐवजी २000 रुपये पाणीपट्टी

Water tax increase in Tasgaon | तासगावमध्ये पाणीपट्टीत वाढ

तासगावमध्ये पाणीपट्टीत वाढ

Next

तासगाव : दिवसेंदिवस खर्चाचा बोजा वाढू लागल्यामुळे तासगाव शहराच्या पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय आज (शुक्रवारी) तासगाव पालिकेने घेतला. वीजदरासह अन्य खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सभागृहापुढे सांगण्यात आले. पाणीपट्टी वाढ अटळ असल्याने घरगुती पाणीपट्टी वार्षिक बाराशे रुपयांऐवजी दोन हजार रुपये करण्यात आली. १ एप्रिल २0१५ पासून नव्या दरवाढीची अंमलजावणी करण्यात येणार आहे. हा निर्णय बहुमताने घेण्यात आला. विरोधी नगरसेवक अनिल कुत्ते यांनी दरवाढीला विरोध केला. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत या मुख्य तसेच विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजय पवार होते. उपनगराध्यक्ष सुरेश थोरात, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यावेळी उपस्थित होते. अर्धा इंची नळ कनेक्शनला बाराशेऐवजी दोन हजार, बिगर घरगुतीसाठी तोच दर, पाऊण इंचीसाठी २४00 ऐवजी चार हजार, बिगर घरगुतीसाठी ५४00 ऐवजी १७,२00 रुपये अशी पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. यासह अन्य विशेष प्रवर्गासाठीचेही दर वाढविण्यात आले आहेत. सध्या वीजदर वाढलेले आहेत. इतर खर्च वाढले आहेत. टप्पा क्रमांक ३ ही योजना सुरू होणार आहे. त्यामुळे दर वाढवावे लागले असल्याचे म्हणणे पाणीपुरवठा विभागाने सभागृहापुढे मांडले. त्याला नगरसेवक कुत्ते यांनी विरोध केला. शहराला सर्वत्र पाणी व्यवस्थित मिळू लागल्यानंतर दरवाढ करा, असे कुत्ते म्हणाले.
यावर नगरसेवक अजय पाटील यांनीही, दरवाढीने तूट भरुनच निघत नसेल, तर काय साध्य होईल, असा प्रश्न उपस्थित केला. पाणीपट्टी दरवाढीच्या प्रमुख विषयासह शहरातील विविध गल्ल्यांमध्ये गटारी बांधण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यात माळी गल्ली, पेटकर प्लॉट, साईनाथ कॉलनी, गुरुवार पेठ, श्री सिध्देश्वर मंदिरजवळील गटार, बागवान चौक या भागात गटारी बांधण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. (वार्ताहर)


नगरपालिकेच्या कारभारावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
दलितेतर योजनेंतर्गत दलितेतर भागात विविध कामे हाती घेणे, ई-गव्हर्नन्सअंतर्गत पालिका कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, माळी गल्लीतील सार्वजनिक स्वच्छतागृह पाडणे, खाडेवाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे, मुख्याधिकारी निवासस्थान दुरुस्ती करणे, पालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम हाती घेणे, या विषयांना मंजुरी देण्यात आली.

Web Title: Water tax increase in Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.