सांगली-मिरजेमध्ये रूजतेय अनोखी वाचन चळवळ, संकल्पना पुस्तक पेटीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 02:01 PM2019-07-01T14:01:24+5:302019-07-01T14:03:32+5:30

आजकाल मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नेहमीच पालक करतात. या समस्येचे उत्तर शोधत एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सजग पालकांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी ह्यवाचन कट्टाह्ण उपक्रम सुरू केलाय. जिथे मूल-तिथे पुस्तक ही संकल्पना घेऊन सध्या सांगली-मिरजेतील विविध भागांमध्ये शनिवार-रविवारी आठ ते दहा वाचन कट्टे सुरू आहेत. त्यांना संवाद समुपदेशन केंद्राच्या अर्चना मुळे यांची साथ मिळतेय.

Unique reading movement in Sangli-Mirage | सांगली-मिरजेमध्ये रूजतेय अनोखी वाचन चळवळ, संकल्पना पुस्तक पेटीची

सांगली-मिरजेमध्ये रूजतेय अनोखी वाचन चळवळ, संकल्पना पुस्तक पेटीची

Next
ठळक मुद्देसांगली-मिरजेमध्ये रूजतेय अनोखी वाचन चळवळसंकल्पना पुस्तक पेटीची, वाचन कट्टा उपक्रम

दत्तात्रय शिंदे 

सांगली : आजकाल मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नेहमीच पालक करतात. या समस्येचे उत्तर शोधत एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सजग पालकांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी वाचन कट्टा उपक्रम सुरू केलाय. जिथे मूल-तिथे पुस्तक ही संकल्पना घेऊन सध्या सांगली-मिरजेतील विविध भागांमध्ये शनिवार-रविवारी आठ ते दहा वाचन कट्टे सुरू आहेत. त्यांना संवाद समुपदेशन केंद्राच्या अर्चना मुळे यांची साथ मिळतेय.

सांगलीतील संवाद समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या पालकांमध्ये मुले मोबाईल-टीव्हीमध्ये गुरफटलेली मुले वाचन करीत नसल्याचा सूर उमटला. या चर्चेतून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनकट्टे सुरू करण्याचा पर्याय समोर आला. त्यासाठी पुस्तके मिळवायची कुठून, असा प्रश्न होता. पण सांगलीतच ह्यवाचनप्रेमीह्ण नावाने लहान मुलांसाठीच वाचनालय चालविणाऱ्या विजया हिरेमठ यांनी साथ देत विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

यानंतर वर्षभरापूर्वी राम मंदिर परिसरातील ज्ञानेश्वर मंदिरात पहिला वाचन कट्टा भरला. मुलांचा प्रतिसादही चांगला मिळू लागला. हे पाहून ग्रुपमधील इतर पालकांनीही आपल्या भागात वाचन कट्टा सुरू करण्याची तयारी दर्शविली. यासाठी हिरेमठ यांच्या सहकार्याने पुस्तक पेटीची संकल्पना पुढे आली.

एका पेटीमध्ये पन्नास पुस्तके, अशा पुस्तक पेट्या प्रत्येक वाचन कट्ट्यावर देण्यात आल्या. सध्या सुनंदा कदम, श्वेता चितळे, सपना लड्डा, स्वाती कानेटकर, शर्वरी ताथवडेकर, मेघना गोखले, वृषाली भांबुरे, दीपाली रामचंद्रे, मानसी गोखले यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर मंदिर, शामरावनगर, आकाशवाणीजवळ सुभाषनगर, गुलमोहर कॉलनी, विश्रामबागमध्ये सावरकर कॉलनी, मिरजेत व्यंकोबा मंदिर, वारणाली, व्यंकटेशनगर, हरभट रोड, गावभाग येथे वाचन कट्टे सुरू आहेत.

कट्ट्यावर येणारी बालवाडीतील मुले, ज्यांना वाचता येत नाही, अशांना गोष्ट वाचून दाखविली जाते. ज्यांना वाचता येते त्यांच्याकडून नियमित वाचन करून घेतले जाते. एखादी गोष्ट अर्धवट सांगून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत ती पूर्ण करण्यास सांगितली जाते.
अशा विविध संकल्पनांमधून मुलांना वाचनाची गोडी लागतेय. कट्ट्यावर वीस-पंचवीस मुले नियमितपणे येत आहेत. पालकही त्यांना साथ देत घरीही मुलांकडून वाचन करून घेतात. वाचनाचे रेकॉर्डिंग करून दर रविवारी ग्रुपवर पोस्ट करतात.

श्रुती ठाणेकर या मुलीने तर ह्यतोतोचानह्णची पाच-पाच मिनिटाची पारायणेच केली आहे. मुग्धा कोळेकर हिने रचलेली बालकांना वाचन कट्ट्यावर येण्यासाठी आवाहन करणारी कविताही सध्या सर्वच वाचन कट्ट्यांवर धुमाकूळ घालतेय. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मोबाईल-टीव्हीमधून बाहेर पडून त्यांचे भावविश्व समृध्द व्हावे, हा उद्देश या कट्ट्यांना मिळणाऱ्या प्रतिसादातून साध्य झाल्याचे दिसतेय.

Web Title: Unique reading movement in Sangli-Mirage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.