सांगली जिल्ह्यातील ऊसतोडी बंद पाडल्या : स्वाभिमानीसह शेतकरी सेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:46 PM2018-11-01T23:46:07+5:302018-11-01T23:47:58+5:30

ऊस दराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील ऊसतोडी बंद पाडल्या, तर विटा परिसरात शेतकरी सेनेने ऊसतोडी ठप्प केल्या

Sassoon shutdown in Sangli district: Farmers' army aggressive with self-respect | सांगली जिल्ह्यातील ऊसतोडी बंद पाडल्या : स्वाभिमानीसह शेतकरी सेना आक्रमक

सांगली जिल्ह्यातील ऊसतोडी बंद पाडल्या : स्वाभिमानीसह शेतकरी सेना आक्रमक

Next
ठळक मुद्देखानापूर, तासगाव, पलूस, वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यामध्ये आंदोलनसागावमध्ये आंदोलन

सांगली : ऊस दराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील ऊसतोडी बंद पाडल्या, तर विटा परिसरात शेतकरी सेनेने ऊसतोडी ठप्प केल्या. ऊस दराचा फैसला होईपर्यंत ऊस तोडीला घेऊ नये, असे आवाहनही संघटनांनी केले आहे. या आंदोलनास शेतकऱ्यांचा पाठींबा आहे.

कर्नाटकातील केंपवाड कारखान्याने मागील हंगामातील ४०० रुपयांचे बिल व यंदाचा ऊस दर जाहीर न करताच तोडणी सुरू केली होती. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही ऊसतोड मजुरांना फुले देऊन गांधीगिरी पध्दतीने बंद पाडली.यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव कोरे, शिवाजी पाटील, प्रदीप जाधव, शहर अध्यक्ष कमलेश्वर कांबळे, बाबू हारगे, किशोर महाजन, राजू झेंडे, अशोक पाटील, प्रकाश हक्के उपस्थित होते.

उसासाठी पहिली उचल मान्य होईपर्यंत शेतकºयांनी तोडी घेऊ नयेत : सयाजी मोरे
इस्लामपूर : सतराव्या ऊस परिषदेत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी उसाच्या पहिल्या उचलीची केलेली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत राज्यातील सहकारी व खासगी कारखाने सुरू करू नयेत, तसेच शेतकºयांनीही तोडी घेऊ नयेत, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे यांनी पत्रकार बैठकीत केले.

ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून शेतकºयांची पिळवणूक सुरू आहे. या चुकीच्या धोरणाविरुध्द खासदार शेट्टी सातत्याने आवाज उठवत आहेत. ऊस परिषदेत त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. ऊसतोडीही बंद केल्या आहेत. मात्र सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू करुन सहकाराला काळिमा फासला आहे. यावरुन कारखानदारांची बांधिलकी शेतकºयांशी आहे का? याची शंका वाटते.

मोरे म्हणाले, एफआरपीचा बेस बदलून शेतकºयाला मातीत घालण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्ह्यातील कारखानदारीचे नेतृत्व करणाºया नेत्यांनी रस्त्यावर उतरुन शेतकºयांच्या बाजूने त्याचा जाब विचारायला हवा होता. मात्र याकडे दुर्लक्ष करुन कारखाने सुरु केले आहेत, याची खंत वाटते. स्वाभिमानी कुठल्याही कारखानदारांचा मित्र नाही आणि जाणीवपूर्वक कोणाचा वैरीही नाही. आमची बांधिलकी ही फक्त शेतकºयांशी आहे.

ते म्हणाले, ऊसतोड मजूर व टोळ्या आल्याने कारखाने सुरू ठेवणे भाग आहे, हे पी. आर. पाटील यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. एका कारखान्याचे ४ कारखाने केले, असे म्हणणाºया नेत्यांनी कधी तरी ऊस दरावर बोलावे. मागीलवेळी एफआरपी अधिक २०० असा तोडगा निघाला. मात्र त्यातील २०० रुपये अद्याप दिलेले नाहीत. मग हंगाम सुरू करण्याची घाई कशासाठी करत आहे, असा कारखानदारांना सवालही मोरे यांनी केला आहे.

सागावमध्ये आंदोलन
सागाव : चालूवर्षीच्या ऊस दरासंदर्भातील उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कारखानदारांनी कारखाने चालू करू नयेत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील यांनी केले. सागाव, नाटोली, लादेवाडी (ता. शिराळा) येथे सुरू असलेल्या ऊसतोडी गुरुवारी कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या.

पाटील म्हणाले, प्रतिवर्षी ऊसदरासाठी ऊसदर आंदोलन, संघर्ष असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समीकरणच ठरले आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन खा. राजू शेट्टी यांनी ऊसदर आंदोलनात आपल्या घामाच्या दामासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी शेतकºयांनीही आंदोलनात सहभागी होण्याची मानसिक स्थिती दर्शविली आहे. मागील हंगामातील एफआरपीची ठरलेली रक्कमही अजून बहुतांशी कारखान्यांनी शेतकºयांना दिलेली नाही.

चालूवर्षीच्या हंगामातील ऊसदराचा निर्णय व्हायच्या आधीच काही कारखानदारांनी कारखाने चालू केले आहेत. परंतु कारखानदारांनी असे करणे बरोबर नाही. शिराळा तालुक्यातील सागाव, नाटोली, कांदे फाटा, देववाडी या गावांमध्ये चालू असणाºया ऊसतोडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद केल्या आहेत. ट्रॅक्टरचा हार काढून चालकाचा सत्कार करून गांधीगिरी आंदोलनही केले.

यावेळी मानसिंग पाटील, अशोक दिवे, शंकर घोलप, जयसिंग पाटील, गुरुनाथ पाटील, सुरेश म्हाऊटकर, भैय्या वडगावकर, प्रकाश पाटील, अरविंद पाटील, अजित पाटील, दादा पाटील, देवेंद्र धस, चंद्रकांत पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Sassoon shutdown in Sangli district: Farmers' army aggressive with self-respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.