Sangli 'Lokmat' anniversary celebrations today | सांगली ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन सोहळा
सांगली ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन सोहळा

सांगली : सामाजिक बांधीलकीची नाळ जपतानाच, वाचकांच्या हृदयात घर करीत, प्रगतीची उंच भरारी घेत ‘लोकमत’ने सांगली जिल्ह्यात १९ वर्षांची वाटचाल पूर्ण करून २० व्या वर्षांत यशस्वी पदार्पण केले आहे. विविध क्षेत्रांशी असलेले हे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी आज, सोमवारी माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता स्नेहमेळावा आयोजित केला आहे़
समाजमनाचा आरसा बनून विश्वासार्हतेने जपणूक करीत ‘लोकमत’ने द्विदशकीय वाटचाल केली. लोकशाहीची तत्त्वे, समाजहिताचे भान बाळगताना वाचन चळवळीला बळकटी देण्याचे कामही ‘लोकमत’ने गेल्या एकोणीस वर्षांत केले. द्विदशकीय यशस्वी वाटचाल करताना वाचकांसह विविध क्षेत्रांतील लोकांशी अतूट असे नाते तयार झाले. नाट्यपंढरी, कलापंढरी, क्रीडापंढरी अशा विविध वैशिष्ट्यांनी राज्य व देशातही आपली ओळख निर्माण केलेल्या सांगली जिल्ह्यातील वाचकांनी ‘लोकमत’च्या या प्रगतीला बळ दिले. विविध क्षेत्रांशी असलेले हे नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्यादृष्टीने वर्धापनदिनानिमित्त सांगलीतील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. वाचक व विविध क्षेत्रांतील लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराने केले आहे.
विशेषांकाचे प्रकाशन
रांगड्या मातीतील देशी खेळ, नावीन्याच्या ध्यासातून आपलेसे केलेले विदेशी खेळ, गल्लीपासून आॅलिम्पिकपर्यंत मैदाने आणि स्पर्धा गाजविणारे खेळाडू, त्यांना घडविणारे प्रशिक्षक, मंडळे अशा अनेक वैशिष्ट्यांनी सांगलीचे क्रीडाविश्व सजले आहे. या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारा संग्राह्य असा ‘सांगलीची क्रीडा परंपरा’ हा विशेषांकही प्रकाशित करण्यात येणार आहे.


Web Title: Sangli 'Lokmat' anniversary celebrations today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.