Rs. 285 crores loan waiver in Sangli district; 101 crores grant to 66 thousand farmers | सांगली जिल्ह्यात आणखी २८५ कोटींची कर्जमाफी,६६ हजार शेतकºयांना १०१ कोटींचे अनुदान

ठळक मुद्देतिसरी यादी जाहीर : दोन दिवसात उर्वरित रक्कम मिळणार आहे

सांगली : शासनाने कर्जमाफीची जिल्ह्याची तिसरी यादी बुधवारी जाहीर केली. यामध्ये एकूण ८0 हजार ९२ शेतकºयांना २८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील ६५ हजार ५४७ शेतकºयांना मिळणार असून त्यांच्या अनुदानाची एकूण रक्कम १0१ कोटी रुपये आहे.

दीड लाखाच्या आतील ३०३७ शेतकºयांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. येत्या चार दिवसात ही रक्कम संबंधित शेतकºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग होणार आहे. कर्जमाफीच्या आजअखेर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. पहिल्या यादीत १ हजार ३४६ शेतकºयांना ६ कोटी ५२ लाखांची कर्जमाफी मिळाली होती. दुसºया यादीत १९ हजार ७७६ शेतकºयांना ७२ कोटींची कर्जमाफी आहे. बुधवारी दुपारी तिसरी यादी शासनाने जाहीर केली.

यात दीड लाखाच्या आतील थकीत शेतकरी, दीड लाखावरील एकरकमी कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांची व नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांचा समावेश आहे.
तीन हजार ३७ शेतकºयांचे दीड लाखाच्या आतील शंभर टक्के कर्ज माफ झाले आहे. त्यांना १० कोटी ९४ लाख ९२ हजार ५९४ रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज थकीत असणाºया व दीड लाखावरील सर्व कर्ज एकरकमी कर्ज परतफेड योजनेंतर्गत फेडण्यास तयार असणाºया ११ हजार ५०८ शेतकºयांचा यात समावेश आहे. या शेतकºयांना दीड लाखावरील रक्कम अदा करण्यास ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर संबंधितांना दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. त्यांची रक्कम सुमारे १७२ कोटी रुपये आहे. जानेवारीमध्ये याचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाºया ६५ हजार ५४७ शेतकºयांना १०१ कोटी ९ लाख ८२ हजार ३३७ रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. यातील ६२ कोटी ६६ लाख ३३ हजार ५८० रुपये जिल्हा बॅँकेला प्राप्त झाले असून दोन दिवसात उर्वरित रक्कम मिळणार आहे. ही रक्कम लाभार्थी शेतकºयांच्या बॅँक खात्यावर पुढील चार दिवसात वर्ग करण्यात येणार आहे.

असा मिळणार लाभ...
कर्जप्रकार शेतकरी रक्कम
दीड लाखापर्यंतची ३0३७ १0,९४,७९,0१0
दीड लाखावरील ११,५0८ १७२,६२,00,000
नियमित कर्जदार ६५,५४७ १0१,0९,८२,३३७
एकूण ८0,0९२ २८४,६६,६१,३४७


Web Title: Rs. 285 crores loan waiver in Sangli district; 101 crores grant to 66 thousand farmers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.