जत तालुक्यात डाळिंब बागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:05 AM2018-06-04T00:05:56+5:302018-06-04T00:05:56+5:30

Pomegranate baga basin in Jat taluka | जत तालुक्यात डाळिंब बागा भुईसपाट

जत तालुक्यात डाळिंब बागा भुईसपाट

Next


बिळूर : निगडी खुर्द (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या परिपक्व झालेल्या डाळिंब फळांचे आणि बागांचे गारपीट व वादळी वाºयाच्या तडाख्याने सुमारे २३ लाखांचे नुकसान झाले आहे. बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्या असून, जोरदार मार बसल्याने फळे खाण्यालायकच राहिली नाहीत. प्रशासनाने पंचनामे केले असले तरी तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
निगडी खुर्द येथील सुदाम जिवाप्पा सावंत यांची डाळिंबाची ६५० झाडे आहेत. त्यांच्याच शेजारील नारायण शिंदे यांचीही दीड एकरावर डाळिंब बाग आहे. वादळी वारा आणि गारपीट यांच्या तडाख्यात या बागा भुईसपाट झाल्या असून, या दोन्ही बागांचे सुमारे २३ लाखांचे नुकसान झाले आहे. या दोघा शेतकºयांनी आंबेबहार धरल्यानेही फळे पक्व झाली होती आणि व्यापारी बागा पाहायला येत होते. अशा अवस्थेतच गारपीट आणि वादळी वाºयाने संपूर्ण बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
त्याचबरोबर गावातील उत्तम पाटील यांच्या केळीच्या बागेचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, सहायक कृषी अधिकारी एन. एम. राठोड यांनी नुकसानग्रस्त बागांचे सर्वेक्षण करून पंचनामा केला.

Web Title: Pomegranate baga basin in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.