कडेगावात फेरपडताळणीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:22 AM2017-09-19T00:22:28+5:302017-09-19T00:22:28+5:30

Boycott | कडेगावात फेरपडताळणीवर बहिष्कार

कडेगावात फेरपडताळणीवर बहिष्कार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांची फेरपडताळणी घेतली. यासाठी फक्त १६ महिला उपस्थित होत्या. दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी फेरपडताळणीवर बहिष्कारामुळे, सह्यांच्या फेरपडताळणीस महिला उपस्थित राहिल्या नाहीत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ आॅगस्टच्या सह्यांच्या पडताळणीत ८८ सह्यांचा गोलमाल केला. त्यावेळी झालेल्या सह्यांच्या पडताळणीचा निकाल जाहीर न करताच फेरपडताळणी कडेगावच्या दारूबंदी चळवळीवर लादली. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी संताप व्यक्त करून बहिष्कार टाकला.
सोमवारी दिवसभर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सह्यांच्या फेरपडताळणीसाठी उपस्थित होते. कडेगाव नगरपंचायतीत टेबल मांडून यंत्रणा सज्ज ठेवली होती. मात्र बहिष्कार टाकल्यामुळे १६ महिलांव्यतिरिक्त कोणीही महिला सह्यांच्या पडताळणीसाठी फिरकल्या नाहीत.
कडेगाव शहरात दारूबंदीसाठी ३ आॅगस्टरोजी पहिल्यांदा सह्यांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यावेळी १३३९ महिलांच्या सह्यांची पडताळणी झाली असल्याचे उत्पादन शुल्कच्या अधिकाºयांनी जाहीर केले होते. त्यावेळची चित्रफीत दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांकडे आहे. तरीही उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या अहवालात १२५१ महिलांच्या सह्यांची पडताळणी झाल्याचे नमूद केले आहे. यापैकी ११८९ सह्या बिनचूक ठरल्यास दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार होती. परंतु उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी ‘अर्थ’पूर्ण व्यवहारातून ३ आॅगस्टच्या सह्यांच्या पडताळणीत तब्बल ८८ सह्यांचा गोलमाल केला, असा आरोप दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी केला आहे.
उत्पादन शुल्कच्या अधिकाºयांनी फेरपडताळणीची पहिली तारीख नेमकी गौरी-गणपतीवेळी जाहीर केली होती. सणामुळे महिला येणार नाहीत, याच हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा शहरात होती. हा निर्णय चळवळीतील कार्यकर्त्यांच्या व महिलांच्या दबावामुळे रद्द झाला होता. त्याचवेळी महिलांनी, फेरपडताळणी नको, ३ आॅगस्टच्या पडताळणीचा निर्णय द्या आणि दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबवा, अशी मागणी केली होती. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा सोमवारी सह्यांची फेरपडताळणी जाहीर केली होती. मात्र महिलांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी सर्व टेबल मांडून महिलांची वाट पाहणाºया उत्पादन शुल्कच्या अधिकारी आणि कर्मचाºयांना, आपापसात गप्पा मारण्याशिवाय आणि मोबाईलशी खेळत बसण्याशिवाय काहीच काम नव्हते.
दरम्यान, ३ आॅगस्टच्या सह्या पडताळणीचा काय घोळ झाला, याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे जिल्हाधिकाºयांनी खुलासा मागितला असल्याचे समजते.
चित्रफीत पाहून जिल्हाधिकाºयांनी कारवाई करावी
उत्पादन शुल्क विभागाने गोलमाल करून दारूबंदी मोहिमेला खो घातला. गोलमाल करणाºया अधिकाºयांवर कारवाई करून दारूबंदीसाठी मतदान घ्यावे. ३ आॅगस्टरोजी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी १३३९ महिलांच्या सह्यांची पडताळणी झाल्याचे कॅमेºयासमोर जाहीर केले आहे. त्याची चित्रफीत उपलब्ध आहे. ही चित्रफीत पाहून जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

Web Title: Boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.