पारंपरिक पध्दतीला फाटा देत आईनेच केले विवाहाचे पौरोहित्य-सांगलीत मुलीचा आगळावेगळा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:54 PM2018-05-17T23:54:36+5:302018-05-17T23:54:36+5:30

मराठा सेवा संघप्रणित जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील व डॉ. सुधीर पाटील यांची कन्या डॉ. अक्षया हिचा विवाह आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पार पडला.

Aunty has made a special arrangement for the marriage of daughter-in-law of daughter-in-law | पारंपरिक पध्दतीला फाटा देत आईनेच केले विवाहाचे पौरोहित्य-सांगलीत मुलीचा आगळावेगळा सोहळा

पारंपरिक पध्दतीला फाटा देत आईनेच केले विवाहाचे पौरोहित्य-सांगलीत मुलीचा आगळावेगळा सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देपुरोगामी पाऊल

सांगली : मराठा सेवा संघप्रणित जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील व डॉ. सुधीर पाटील यांची कन्या डॉ. अक्षया हिचा विवाह आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पार पडला. या लग्नात पारंपरिक पध्दतीला फाटा देत डॉ. निर्मला पाटील यांनीच मुलीच्या लग्नात पौरोहित्य केले. कर्मकांडांना थारा न देता झालेल्या या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे.

परंपरेनुसार विवाह संस्कारात महिलांना स्थान नसते. पण ही पध्दत मोडून काढत डॉ. पाटील यांनी स्वत: मुलीच्या लग्नात सर्व संस्कार पार पाडले. आतापर्यंत आईने पौरोहित्य करण्याची ही पहिलीच घटना आहे. या विवाहात अपर्णा खांडेकर व जयश्री पाटील (आरग) यांनी शिवसेवक म्हणून काम पाहिले. वर्तमानात महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ही घटना महत्त्वाची ठरणार आहे.

या लग्नाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अक्षतांसाठी धान्याचा वापर न करता उपस्थितांनी टाळ्या वाजवून वधु-वराचे अभिनंदन केले. पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कोणीही आहेर, पुष्पगुच्छ आणला नव्हता. उलट सिंदखेडराजा येथे उभारण्यात येणाऱ्या जिजाऊ सृष्टीसाठी देणगी पेटी ठेवण्यात आली होती. विवाहावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, वधु-वरांची शपथ आणि विवाहापूर्वी झालेला कुळ स्वागताचा समारंभ याप्रकारे हा विवाह समारंभ झाला. या आगळ्या-वेगळ्या विवाहाबद्दल नागरिकांनी डॉ. पाटील दाम्पत्याचे स्वागत केले.
सांगलीत डॉ. निर्मला पाटील यांनीच मुलीच्या लग्नात पौरोहित्य केले.

Web Title: Aunty has made a special arrangement for the marriage of daughter-in-law of daughter-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.