मैत्रीचं नातं टिकवण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 02:40 PM2018-07-18T14:40:43+5:302018-07-18T14:41:48+5:30

मैत्रीच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तरिदेखील मैत्रीचं नातं हे सर्व नात्यांमध्ये वेगळं ठरतं. अनेक लेखंकांनी आणि कवींनी मैत्रीबद्दल लिहून ठेवलं आहे.

Remember these things to protect your friendship | मैत्रीचं नातं टिकवण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

मैत्रीचं नातं टिकवण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

Next

मैत्रीच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तरिदेखील मैत्रीचं नातं हे सर्व नात्यांमध्ये वेगळं ठरतं. अनेक लेखंकांनी आणि कवींनी मैत्रीबद्दल लिहून ठेवलं आहे. मित्र-मैत्रिणींशी आपण मनातल्या गोष्टी पटकन शेअर करतो. मजामस्ती, बाहेर फिरायला जाणं यांसारख्या गोष्टीचे प्लॅन आपण मित्र-मैत्रिणींसोबत करतो. ज्या गोष्टी आपण कोणाला सांगू शकत नाही त्या गोष्टी आपण मित्र-मैत्रिणींशी शेअर करून मन हलकं करतो. आज आपण जाणून घेऊयात अशा काही गोष्टी ज्यामुळे तुमचं नातं आणखी मजबूत होईल. 

1. पैशांची देवाण घेवाण

पैशांमुळे अनेक नात्यांमध्ये फूट पडते, असे आपण नेहमीच ऐकतो. त्यामुळे पैशांना आपल्या मैत्रीच्या नात्यामध्ये कधीच येऊ न द्यावे. तुमची मैत्री कितीही जुनी असली तरिदेखील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून नेहमीच काळजी घ्या. शक्य असल्यास मैत्रीमध्ये देवाण-घेवाण करू नका. गरज भासल्यास तुम्ही मित्र-मैत्रिणींकडून पैसे घेऊ शकता. पण ते वेळीच परत करणे नेहमी चांगले असते.

2. आपली कामं स्वतः करा

बरेच मित्र आपली छोटी छोटी कामं आपल्या मित्रांना सांगतात. ज्याचा मैत्रीवर विचित्र परिणाम होतो. नेहमी आपली कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही फारच अडचणीत असाल तर त्यांती मदत घेऊ शकता. पण ज्यावेळी त्यांना गरज असेल त्यावेळीही त्यांना मदत करण्यासाठी पुढे व्हा.

3. विश्वास ठेवा

कोणतही नातं हे विश्वासावर टिकून असतं. त्यामुळे तुमच्यात विश्वास असेल तर तुमची मैत्री कायम राहते. त्यामुळे कधीही आपल्या मित्रमैत्रीणींचा विश्वास तोडू नका. 

4. कधीही मित्र-मैत्रिणींना इग्नोर करू नका 

कधी कधी काम आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके व्यस्त होतो की, आपल्या मित्र-मैत्रिणींना वेळ देऊ शकत नाही. ज्यामुळे मैत्रीच्या नात्यामध्ये बऱ्याचदा फूट पडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे मित्र-मैत्रिणींसाठी वेळ काढा. थोडा वेळ का होईना त्यांना भेटा.

5. अहंकार ठेवू नका

अहंकारामुळे अनेक नात्यांमध्ये फूट पडते. त्यामुळे मैत्रीमध्ये शक्यतो अहंकार टाळा. आपणच कसे सगळ्यांपेक्षा चांगले आहोत, असे दाखवणेही टाळा.

Web Title: Remember these things to protect your friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.