आता शाळेच्या फॉर्मवरून 'आई' आणि 'वडिल' शब्द हद्दपार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 04:04 PM2019-02-22T16:04:54+5:302019-02-22T16:07:19+5:30

मुलांची शाळा म्हणजे पालकांच्या डोक्याला ताप असतो. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या कामाचा व्याप आणि सोबत मुलांच्या शाळेतील नियम. अनेक पालकाच्या नाकी नव आणतात.

This is the reason why french schools will not use mother father | आता शाळेच्या फॉर्मवरून 'आई' आणि 'वडिल' शब्द हद्दपार!

आता शाळेच्या फॉर्मवरून 'आई' आणि 'वडिल' शब्द हद्दपार!

Next

(Image Credit : The Independent)

मुलांची शाळा म्हणजे पालकांच्या डोक्याला ताप असतो. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या कामाचा व्याप आणि सोबत मुलांच्या शाळेतील नियम. अनेक पालकाच्या नाकी नव आणतात. अनेकदा शाळेमध्ये एखाद्या पॅरेट्स मिटींगसाठी आई आणि वडिल दोघांना येणं बंधनकारक असतं. अनेक शाळांमध्ये मुलांसोबतच आई-वडिलांसाठीही काही अ‍ॅक्टिविटी ठेवल्या जातात. एवढचं नाही तर अनेक शाळांमध्ये मुलांना अ‍ॅडमिशन देण्याआधी आई-वडिलांचाही इंटरव्ह्यू घेण्यात येतो. यामागे शाळेचा मुख्य उद्देश असतो की, आपलं मुल काय करतयं याबाबत पालकांनाही समजावं, तसेच आपल्या मुलाबाबत पालक किती सजग आहेत याबाबत माहिती करून घेण्याचा असतो. अनेक शाळांमध्ये तर मुलांसोबतच पालकांनाही काही नियम फॉलो करावे लागतात. अशाच एका शाळेत एक आगळा-वेगळा नियम काढण्यात आला आहे. 

खरं तर हा नियम सामाजिक जाणीव करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. फ्रान्सच्या नॅशनल असेंबलीने एक नवीन नियम सुरू केला आहे. ज्यातंर्गत फ्रान्समधील सर्व शाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या फॉर्म्समध्ये 'मदर' आणि 'फादर' या शब्दांचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गोंधळलात ना? असा नियम का काढला असावा, हाच विचार करताय ना? तेही सांगतोय... 'मदर' आणि 'फादर' या शब्दांऐवजी आता 'पॅरेंट 1' आणि 'पॅरेट 2' हे दोन शब्द वापरण्याचा आदेश देण्यात आला आहे. फ्रान्सच्या स्कूल ऑफ ट्रस्ट बिलमध्ये एक संशोधन करण्यात आले होते. त्यानंतर ते दोन शब्द हद्दपार करून 'पॅरेंट 1' आणि 'पॅरेट 2' हे दोन शब्द वापरण्यास सांगितले आहे. संशोधकांनी हे संशोधन करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे, समलिंगी पालकांसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये हाच होता.

कुटुंबातील विविधतेला स्विकारण्यात यावं

फ्रान्सचे राष्ट्रपती इमानुएल मॅक्रॉ यांची पार्टी 'ला रिपबल्कि एन मार्च पार्टी'नेही पूर्ण बहुमतासह या निर्णयाचं स्वागत केलं आहे. एमपी वॅलेरी पेटिट यांनी हे संशोधन फ्रेंच असेंबलीमध्ये मांडताना सांगितले की, या संशोधनामागील मुख्य उद्देश म्हणजे, एक असा कायदा आहे, ज्यामार्फत मुलांच्या कुटुंबातील विविधता शाळेत भरून घेण्यात येणाऱ्या प्रशासनिक फॉर्म्सवरही स्विकारण्यात येईल. पेटिट यांच्या मते, याआधीच्या नियमांमध्ये समलिंगी पालकांबाबत काहीच विचार करण्यात आला नव्हता. 

जुन्या सामाजिक आधारांवर तयार करण्यात आले होते शाळेचे फॉर्म्स 

पेटिट यांच्या मते, आपल्या समोर अशी अनेक कुटुंब होती, ज्यांना जुन्या सामाजिक आणि कौंटुंबिक नियमांनुसार तयार करण्यात आलेल्या फॉर्म्सवर टिक करावी लागत असे. आमच्यासाठी हे संशोधन नसून सामाजिक बरोबरीसाठी उचललेलं एक पाऊल आहे. दरम्यान, फ्रान्सचे काही एमपी असेही आहेत, जे या निर्णयामुळे अजिबात खूश नाहीत. 

'पॅरेंट 1' आणि 'पॅरेट 2'चा शब्दांचा वापर होणार

संशोधनामध्ये सांगितल्यानुसार, कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून वाचण्यासाठी शाळेमध्ये नाव दाखल करताना, वर्गाच्या रजिस्टरमध्ये, पालकांची संमती घेताना आणि इतर प्रकारचे अधिकारीक फॉर्म ज्यांमध्ये मुलांचा समावेश असेल त्यांमध्ये फक्त 'पॅरेंट 1' आणि 'पॅरेट 2' या शब्दांचा उल्लेख करण्यात येईल. वर्ष 2013मध्ये फ्रान्समध्ये समलिंगी लोकांना लग्न करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. 

Web Title: This is the reason why french schools will not use mother father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.