OMG: People of 'this' zodiac may not love each other, otherwise ...! | OMG : चुकूनही ‘या’ राशीच्या लोकांनी एकमेकांवर करू नये प्रेम, अन्यथा...!

सध्याच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये कपल्सचे रिलेशन फार जास्त काळ टिकत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सुरुवातीला रिलेशनमध्ये सर्वकाही सुरळीत असते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. कोणतीही समस्या समजूतदारीने सोडवितात. त्यांच्या लाइफमध्ये वाद-विवादाला जागाच नसते. मात्र काही काळानंतर दोघांमध्ये हळुहळू वाद सुरु होऊ लागतात. एकमेकांवर प्रेमाऐवजी संताप करु लागतात, त्यामुळे दुरावा निर्माण होऊ लागतो. 

असे म्हटले जाते की, राशींचादेखील परिणाम नात्यांवर होत असतो. आज आम्ही आपणास काही अशा राशींबाबत माहिती देत आहोत, ज्यांचा मेळ चांगला नसतो. ज्यामुळे नात्यात कटुता निर्माण होऊन नात्यात दुरावा निर्माण होतो. जर आपला राशींवर विश्वास असेल तर नक्की वाचा.  

* धनु आणि वृषभ राशी 
धनु राशीचे लोक धैर्यवान असतात तर वृषभ राशीचे लोक बोरिंग असतात. या बदलांमुळे दोघांमध्ये नेहमी वाद सुरु असतात. 

* कर्क आणि मकर राशी
या दोन्ही राशीचे लोक एकमेकांच्या बिल्कुल विरुद्ध असतात. त्यामुळे हे कपल नेहमी लहान-सहान गोष्टींवरून भांडण करत असतात. स्वत:ला नात्यासाठी समर्पित करु नच या कपल्समध्ये सर्वकाही सुरळीत होऊ शकते.  

* मेष आणि वृषभ राशी
मेष राशीचे लोक खूपच भावनिक असतात. मात्र वृषभ राशीचे लोक खूपच प्रामाणिक असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये नेहमी वाद सुरु असतात. 

* वृश्चिक आणि मिथुन राशी
मिथुन राशीचे लोक दिलखुलास असतात, तर वृश्चिक राशीचे लोक संशयी असतात. ते कधी आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद विवाद होत असतात.  
Web Title: OMG: People of 'this' zodiac may not love each other, otherwise ...!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.