OMG : ​प्रेमी जोडप्याला पाहून सिंगल मुलींच्या मनात येतात ‘हे’ विचार !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 11:17 AM2017-09-21T11:17:35+5:302017-09-21T16:47:35+5:30

त्या प्रेमात रमलेल्या जोडप्यांकडे पाहून अशा अनेक गोष्टींचा विचार करु लागतात, ज्याचा विचार आपण कदापी करु शकत नाहीत. जाणून घेऊया काय विचार करतात?

OMG: The idea of ​​lover couples come in the minds of single girls! | OMG : ​प्रेमी जोडप्याला पाहून सिंगल मुलींच्या मनात येतात ‘हे’ विचार !

OMG : ​प्रेमी जोडप्याला पाहून सिंगल मुलींच्या मनात येतात ‘हे’ विचार !

Next
ल्यासमोर एखादे जोडपे प्रेमात रमलेले दिसले तर आपल्या मनात काय विचार येतो? कदाचित आपणास हा प्रश्न व्यर्थ वाटत असेल, मात्र मुलींचा विचार केल्यास त्या प्रेमात रमलेल्या जोडप्यांकडे पाहून अशा अनेक गोष्टींचा विचार करु लागतात, ज्याचा विचार आपण कदापी करु शकत नाहीत. जाणून घेऊया काय विचार करतात? 
  
* स्वत:चा एकटेपणा सतावतो
सिंगल मुलीसमारे एखादे जोडपे असेल तर ती सर्वप्रथम स्वत:च्या एकटेपणाचा विचार करते. अशा जोडप्यांना पाहून मुलींना हा विचार सतावतो, की त्यांचे आयुष्य किती अर्धवट आहे. 

* प्रेमाची कमतरता भासणे 
सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांना प्रेम करताना पाहून सिंगल मुलींना आपल्या आयुष्यातील प्रेमाची उणीव जाणवते. आपल्यावरही प्रेम करणारे असे कोणी असते तर? असा विचार मुली करतात. 

* जोडप्यातील मुलीचा हेवा वाटणे
जोडप्यांना एकत्र पाहून सिंगल मुलींच्या मनात विचार येतो की कदाचित आपल्याकडेही असा बॉयफ्रेंड असता तर...ती त्या मुलीचा हेवा करु लागते किंवा काही मुली विचार करतात की या मुलीला असा बॉयफ्रेंड कुठून मिळाला? मी तर हिच्याहून सुंदर आहे. 

* जोडप्याविषयी मत्सर वाटणे
जेव्हा एखादी सिंगल मुलगी कोणत्याही जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी पाहते तेव्हा कधीकधी तिच्या मनात त्या जोडप्याविषयी मत्सर वाटतो. विचार येतो की काय वात्रट आहेत, यांना दुसरी जागा मिळाली नाही का? 

* बॉयफ्रेंडपेक्षा उत्तम आहे कुत्रा पाळणे 
काही सिंगल मुलींना बॉयफ्रेंड बनवण्यापेक्षा एखादा कुत्रा पाळणे उत्तम पर्याय वाटतो. जोडप्यांना पाहून काही सिंगल मुलींना वाटते की मुलांपेक्षा प्रामाणिक कुत्री असतात. त्यामुळे बॉयफ्रेंडच्या ऐवजी कुत्रा पाळणे जास्त योग्य ठरेल. 

* उद्या हेच दोघे एकमेकांशी भांडतील 
जेव्हा एखादी सिंगल मुलगी जोडप्याला एकमेकांशी प्रेमाने बोलताना बघते तेव्हा तिच्या मनात असाही विचार येतो की, आज यांचं प्रेम उतू जातंय, उद्या हीच दोघे एकमेकांशी भांडतील. प्रेमात पडलेल्या जोडप्यांना एकत्र पाहिल्यानंतर ही एकटेपणाची जाणीव अधिक तीव्र होते. सामान्यत: प्रेमात पडलेल्या जोडप्यांना पाहून मुलींच्या मनात असे विचार येतात. कुठेतरी या सिंगल मुली स्वत:ला एकटे समजतात.       
 
Also Read : OMG : सध्याच्या रिलेशनशिपमागील हे आहेत ‘४’ वाईट सत्य !


 

Web Title: OMG: The idea of ​​lover couples come in the minds of single girls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.