तरुणांनी सांगितली 'मन की बात', रिलेशनशिपचं सत्य आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:19 PM2019-04-03T13:19:08+5:302019-04-03T13:25:14+5:30

लोकांची लाइफस्टाइल इतकी बदलली आहे की, लोक नवीन काहीही करण्यासाठी वेळ काढू शकत नाहीयेत.

New survey reveals young people choosing to remain single | तरुणांनी सांगितली 'मन की बात', रिलेशनशिपचं सत्य आलं समोर!

तरुणांनी सांगितली 'मन की बात', रिलेशनशिपचं सत्य आलं समोर!

Next

लोकांची लाइफस्टाइल इतकी बदलली आहे की, लोक नवीन काहीही करण्यासाठी वेळ काढू शकत नाहीयेत. म्हणजे बघा ना जीवन जगण्याच्या पद्घतीसोबतच तरूणाईच्या विचारांमध्येही आधीच्या लोकांच्या तुलनेत फार बदल झाला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून तरूणाईचे रिलेशनशिपबाबतचे विचार समोर आले आहेत. सर्व्हेनुसार, जास्तीत तरूणांना सिंगल रहायचं आहे आणि सोबतच त्यांचा लग्नावरही विश्वास नाही. याचं कारण बदलती जीवनशैली आणि दृष्टीकोनात झालेलं परिवर्तन आहे.

सिंगल राहताना जगणं सोपं

(Image Credit : Entrepreneur)

टींडर आणि कन्सल्टिंग फर्म मोरार एचपीआयने सिंगल लोकांवर फोकस केलं आणि यातून समोर आलं की, १८ ते २५ वर्षांचे ८६ टक्के तरूणांना सिंगल रहायचं आहे. त्यांच्यानुसार, सिंगल राहून जगणं सोपं आहे आणि त्यांना अधिक सकारात्मक वाटतं. काही तरूणांचं तर हे म्हणणं आहे की, सिंगल राहिल्याने करिअरबाबत चांगले पर्याय मिळतात. 

बदलत आहे मानसिकता

(Image Credit : blog.ecampus.com)

आधीच्या लोकांच्या तुलनेत आताच्या तरुणांच्या विचारात बराच बदल झालाय. आता त्यांना सिंगल राहण्यात काहीच चुकीचं वाटत नाही. त्यांना एकटं राहून लाइफस्टाइल जगणं जास्त सोपं वाटतं. सर्व्हेनुसार, ९० टक्के तरुण आठवड्यातून एक किंवा दोनदा डेटला जातात. ७७ टक्के तरुणांचं म्हणणं आहे की, सिंगल राहिल्याने ते जास्त रोमांचक आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेऊ शकतात. कदाचित पार्टनर असल्यावर या गोष्टी अनुभवता येणार नाहीत.

कपल्स घेताहेत वेगळं राहण्याचा निर्णय

ही बाबही समोर आली आहे की, कपल्स सहमतीने एकमेकांपासून काही काळासाठी वेगळे राहण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्यानुसार, ही एक स्मार्ट पाऊल आहे. कारण यादरम्यान ते एकमेकांना स्वातंत्र्य देतात, जेणेकरुन या वेळेत ते एकमेकांसाठी वेळ काढू शकतील. आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत राहू शकतील. 

रिलेशनशिप आहे एक्स्ट्रा बोनस

(Image Credit : rodemill.co.uk)

हे तर स्पष्ट आहे की, वर्तमानात तरुण संधींच्या शोधात आहेत आणि त्यासाठी ते सतर्क राहतात. आता तर ते पार्टनरआधीच परिवार आणि मित्रांच्या आनंदावर लक्ष देतात. तरुणाई आधी एक चांगलं जीवन शोधतात आणि रिलेशनशिपला एक एक्स्ट्रा बोनस समजतात. अशा तरुणांची संख्या वाढत आहे जे डेटींग साइटवर जाऊन पार्टनरचा शोध घेण्याऐवजी आधी स्वत:चा शोध घेतात.

Web Title: New survey reveals young people choosing to remain single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.